कृषी सेवा केंद्रांना दूपारी ३ पर्यंत परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:46+5:302021-05-22T04:17:46+5:30

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ मे ते १ जून या कालावधीसाठी लावण्यात आलेल्या निर्बंधात बदल करून कृषी ...

Permission for agricultural service centers till 3 pm | कृषी सेवा केंद्रांना दूपारी ३ पर्यंत परवानगी

कृषी सेवा केंद्रांना दूपारी ३ पर्यंत परवानगी

Next

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ मे ते १ जून या कालावधीसाठी लावण्यात आलेल्या निर्बंधात बदल करून कृषी सेवा केंद्रांना सकाळी सात ते दुपारी तीन अशी वेळ वाढवून देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर दिले आहेत .या आधीच्या आदेशात ही वेळ सकाळी सात ते दुपारी दोन अशी होती.

सद्यस्थितीमध्‍ये खरीप हंगाम सुरू असल्‍याने तसेच शेतीची कामे सुरु असल्‍यामुळे कृषी निविष्‍ठा व त्‍या संबंधित कृषी सेवा केन्‍द्र, कृषी अवजारे, कृषी साहित्‍य बी-बियाणे विक्री सेवा केन्‍द्रे यांच्यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तथापि, जिल्‍ह्यातील कोविड रुग्‍णसंख्‍येची वाढ लक्षात घेता बांधावर निविष्‍ठा वाटप, ई-कॉमर्स (ऑनलाईन विक्री), घरपोच सेवा ई-पद्धतीचा वापर करुन थेट संपर्क कमीत कमी येईल व शेतकऱ्यांना निविष्‍ठा उपलब्‍ध होतील यासाठी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी त्‍यांचे स्‍तरावरून आवश्‍यक ते नियोजन करावे, असे आदेशात म्हटले आहे.

बाॅक्स..

काेविड चाचणी अनिवार्य

कोविडच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्र व संबंधित दुकानांमध्‍ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेणे अनिवार्य राहील. सर्व प्रकारच्‍या कृषी उत्‍पादने व साहित्‍याचा पुरवठा हा नियमितपणे सुरू राहील तसेच कृषी साहित्‍य व संबंधित उत्‍पादने यांची मालवाहतूक याकरिता स्‍वतंत्र परवानगीची आवश्‍यकता राहणार नाही. कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होऊ नये या करिता निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशांचे तंतोतत पालन करण्‍यात यावे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

Web Title: Permission for agricultural service centers till 3 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.