कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:01+5:302021-06-16T04:26:01+5:30

काेराेना काळात सर्व कामधंदे बंद असल्याने, अनेक जण घरी असल्याने कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून ...

Persecution of men during the Corona period; Complaint against wife in Paelis! | कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!

कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!

googlenewsNext

काेराेना काळात सर्व कामधंदे बंद असल्याने, अनेक जण घरी असल्याने कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून घेतला तर काहींच्या कुटुंबामध्ये वाद झाला. जिल्ह्यात एकूण ४३९ तक्रारी या २०२० व मे २०२१ पर्यंत प्राप्त आहेत. यामध्ये पुरुषांच्या महिलांविरुध्द १३ तर महिलांच्या पुरुषांविरुध्द ४२६ तक्रारींचा समावेश आहे. शहरातील अनेक समाजसेवकांनी हे प्रकरण आपसात केले आहे. तर पाेलीस विभागाकडून १३० प्रकरणात सामंजस्य केले असल्याची नाेंद आहे.

सहवास वाढला भांडणेही वाढली!

काेराेना संसर्गामुळे काेणतेही काम नाही. घरात सर्वांशी सहवास वाढला. या सहवासातून घरी बसल्या बसल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद‌्भवणे सुरू झाले. सहवास वाढल्याने भांडणेही वाढल्याचे दिसून येते.

२०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात २७ जणांचे पुन्हा जमले

काेराेना काळात सर्वच जण घरी, त्यातून अनेकांची भांडणे झालीत, तर काहींनी सहवास वाढल्याने आनंदात वेळ घालविला. २०२० व २१ मध्ये महिलांच्या पुरुषांविरुध्द व पुरुषांच्या महिलांविरुध्द एकूण ४४९ तक्रारी प्राप्त झााल्या. यापैकी १३ तक्रारी वगळता सर्व तक्रारी महिलांच्या आहेत. यापैकी महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या साहाय्याने १३० जणांमध्ये सामंजस्य करण्यात आले. यामध्ये २०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात मे महिन्यापर्यंत २७ प्रकरणाचा समावेश आहे. ही १३० कुटुंबे व्यवस्थित जीवन जगत असून पुन्हा याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

भांडणाची ही काय कारणे झाली?

काेराेना काळात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला, यातून विविध खाद्यपदार्थांची फर्माइश वाढली. ती पूर्ण न केल्याने, पत्नी माेबाइलवर जास्त वेळ राहते म्हणून भांडण वाढले. दारू पिऊन येऊन घरात धिंगाणा घातला जात असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी १३

भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी ४३९

महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी ४२६

Web Title: Persecution of men during the Corona period; Complaint against wife in Paelis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.