दिव्यांग व्यक्तींना सादर करावे लागणार हयातीचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:43+5:302020-12-04T04:53:43+5:30
महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना प्रशासनाकडून ६०० व ८०० रुपये उदर निर्वाह भत्ता दिला जाताे. भत्ता घेणाऱ्या संबंधित व्यक्तींना ३१ ...
महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना प्रशासनाकडून ६०० व ८०० रुपये उदर निर्वाह भत्ता दिला जाताे. भत्ता घेणाऱ्या संबंधित व्यक्तींना ३१ डिसेंबर पर्यंत हयातचे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आहे. यापूर्वी दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने मुदतवाढ देण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत मनपातील दिव्यांग कक्षात येथे हयात प्रमाणपत्र व ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत सादर करावी. मृत्यू झालेल्या दिव्यांग व्यक्तीची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी देणे अपेक्षित आहे. शहरातील ४० टक्केपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांगांनी अद्यापपर्यंत मनपात नोंद केली नाही. त्यांनी मनपातील दिव्यांग कक्षात नोंद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.