कीटकनाशक विषबाधेने मृत्यू; दोन कुटुंबांना आठ लाखांची मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 01:17 PM2019-12-08T13:17:39+5:302019-12-08T13:20:23+5:30

हिंमत हरिभाऊ करवते आणि विजय गोवर्धन सरदार या दोन शेतकºयांचा २०१८ मध्ये पिकावर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने मूत्यू झाला होता.

Pesticide poisoning; 8 lakh help to two farmer families! | कीटकनाशक विषबाधेने मृत्यू; दोन कुटुंबांना आठ लाखांची मदत!

कीटकनाशक विषबाधेने मृत्यू; दोन कुटुंबांना आठ लाखांची मदत!

Next
ठळक मुद्दे मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता.आठ लाख रुपयांचा निधी बार्शीटाकळी व तेल्हारा तहसीलदारांना वितरित करण्यात आला.

अकोला : कीटकनाशक फवारणीतून विषबाधेने गतवर्षी मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी शासनामार्फत प्राप्त झालेला आठ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी बार्शीटाकळी व तेल्हारा तहसीलदारांना वितरित करण्यात आला. प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तहसीलदारांमार्फत मृतक शेतकऱ्यांच्या दोन कुटुंबांना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी चेलका येथील हिंमत हरिभाऊ करवते आणि तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील विजय गोवर्धन सरदार या दोन शेतकºयांचा २०१८ मध्ये पिकावर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने मूत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या दोन शेतकºयांच्या कुटुंबांकरिता मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता.

Web Title: Pesticide poisoning; 8 lakh help to two farmer families!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.