कीटकनाशक फवारणीमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:45 AM2017-10-04T01:45:01+5:302017-10-04T01:45:23+5:30

अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग, तज्ज्ञ, खळबळून जागे झाले असून, कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pesticide spraying deaths of farmers! | कीटकनाशक फवारणीमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू!

कीटकनाशक फवारणीमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू!

googlenewsNext
ठळक मुद्देउंच पिकात फवारणी करताना काळजी घेण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहनपिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यूकृषी विभाग, तज्ज्ञ, झाले खळबळून जागे 

राजरत्न सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग, तज्ज्ञ, खळबळून जागे झाले असून, कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील यवतमाळ व अकोला जिल्हय़ात शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. 
सध्या पश्‍चिम विदर्भात दमट, उष्ण व प्रखर ऊन अशाप्रकारचे वातावरण आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड ओळीने केली आहे. काही भागात कपाशीच्या सर्वसाधारण वाढीपेक्षा १ ते १.५ फूट जास्तीची वाढ (४.५ ते ६ फूट) झाली आहे. त्यामुळे ही कपाशी दाटली असून, पिकात सहज शिरता येत नाही. कपाशीच्या शेतात खेळती हवा येत नसल्याने  पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक व बोंडअळ्यांना पोषक ठरत आहे.
दरम्यान, किडींचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शेतकर्‍यांनी शिफारस केलेली कीटकनाशके नामांकित कंपनीकडून खरेदी करावे, कीटकनाशके कुलूपबंद पेटीत ठेवावी, कीटकनाशके लहान मुलांपासून दूर ठेवावीत, माहितीपत्रक वाचून खबरदारी घ्यावी, तणनाशकांचा पंप कीटकनाशक फवारणीसाठी वापरू  नये, कीटकनाशकांची मात्रा मोजून घ्यावी.पद्धतीने दाट व उंच कपाशीच्या पिकात फवारणी करणे आवश्यक असल्यास एकेरी नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे फवारणीचा घेर कमी होऊन द्रावणाचा तुषार रू पाने फवारणी करणार्‍यांशी संपर्क कमी येतो. दाट पिकात चालण्याचा वेग कमी होतो, दाटलेल्या पिकात मोकळा श्‍वास घेता येत नाही, सध्याच्या वातावरणात तासन्तास फवारणी केल्यामुळे घाम येतो, कीटकनाशकाचे द्रावण सहज फवारणी करता येत नाही, फवारणी यंत्राची दांडी सहज खाली-वर फिरवता येत नाही, फवारा कंबरेच्यावर व चेहर्‍याच्या पातळीवर करतानाचे शास्त्रज्ञांच्या चमूला आढळून आले आहे. अशा पद्धतीने केलेल्या फवारणीमुळे द्रावण, अंगावर, डोळ्यात व श्‍वासाद्वारे नाकात जाते. डोळ्यांनी अंधुक दिसते व चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत. म्हणूनच फवारणी पंपाचा वापर करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग व कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकर्‍यांना दिला आहे. पीक हंगामात दीर्घकाळ कीटकनाशकांची फवारणी केल्यास ती व्यक्ती कीटकनाशकांच्या संपर्कात येते. हे टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. दाटलेल्या पिकांमध्ये शेतमजूर दिवसभर फवारणी करीत असल्याचे चमूला आढळून आले आहे. अशा व्यक्तीमध्ये त्वचेची अँलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, हेही लक्षणे दिसू शकतात.
किटकनाशक वापरताना   प्लास्टिक बकेटमध्ये कीटकनाशकांची आवश्यक मात्रा पाण्यामध्ये घेऊन काठीने एकजीव मिश्रण करावे, आवश्यक क्षेत्रासाठी पाण्यात मिसळून फवारणीचे द्रावण तयार करावे, फवारणी पंपातून सर्वसाधारण मध्यम आकाराचे (१00 ते ३00 मायक्रॉन) थेंब पडतात म्हणून मध्यम आकाराचे थेंब फवारणीसाठी योग्य आहेत. यापेक्षा लहान आकाराचे थेंब फवारल्यास पिकावर योग्य त्या ठिकाणी पडण्यापूर्वी ते वार्‍याने इतरत्र जाण्याची शक्यता असते. फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा, फवारणी हवेच्या दिशेने सकाळी किंवा संध्याकाळी करावी, पंपाच्या नोझलमधील कचारा तोंडाने फुकून काढू नये, कीटकनाशकाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे, फवारणीच्यावेळी खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये, खाद्यपदार्थ, तंबाखू किंवा बीडी ओढण्यापूर्वी तोंड, हात, पाय स्वच्छ धुवावेत, फवारणीनंतर अंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावेत, कीटकनाशक फवारलेल्या शेतामध्ये ‘इशारा फलक’ लावावे.

बाधित व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी?
कीटकनाशकांची पोटातून, त्वचा, डोळे, श्‍वसन इंद्रिये इत्यादीद्वारे विषबाधा होऊ शकते.विषबाधा झालेल्या व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे बदलावे, बाधित भागात ताबडतोब साबणाने स्वच्छ धुऊन, कपडा, टॉवलने पुसावे, कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तीस ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी, रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच विडी, सिगारेट, तंबाखू देऊ नये, घाम येत असल्यास टॉवेलने पुसावे, थंडी वाजल्यास अंगावर पांघरू ण घालावे, श्‍वासोच्छवास योग्य रीतीने सुरू  आहे का, ते बघावे, श्‍वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित त्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्‍वासोच्छवास सुरू  करावा, झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी, बेशुद्ध पडल्यास शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे, तसेच त्याला त्वरित कीटकनाशकांच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांना दाखवून त्यांच्या निगराणीत उपचार सुरू  करावे, रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करावी.

सर्वात विषारी कीटकनाशक कोणते?
डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्हे असलेली कीटक नाशके सर्वात विषारी आहे. त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींना समजण्यासाठी असतात. हिरव्या रंगाचे चिन्हे असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात, फारच आवश्यकता असल्यास डब्यावर लाल रंगाचे चिन्हे असलेली कीटकनाशके वापरावी, अशी कीटकनाशके पर्यावरण, मानव, जीवजंतूंना तुलनेने जास्त हानिकारक असतात.

कीटकनाशकामुळे अकोला व यवतमाळ जिल्हय़ात शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. शेतकरी, शेतमजुरांनी फवारणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विषबाधा टाळता येईल. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हे करावे.
डॉ. धनराज उंदिरवाडे,
विभाग प्रमुख, कीटकशास्त्र,
डॉ. पंदेकृवि, अकोला.

Web Title: Pesticide spraying deaths of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.