शेतक-यांना ५0 टक्के अनुदानावर कीटकनाशके
By Admin | Published: August 21, 2015 01:17 AM2015-08-21T01:17:18+5:302015-08-21T01:17:18+5:30
खरीप पिकांवर किडींचे आक्रमण.
अकोला : विदर्भातील खरीप पिकावर विविध किडींनी आक्रमण केले असून, ही कीड कापूस, सोयाबीनच्या पानांची चाळणी करीत असल्याने शेतकर्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने ५0 टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध केली आहे. विदर्भात दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले होते; परंतु गत पंधरा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली असून, तापमानात वाढ झाली आहे. किडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र १२ लाख हेक्टरच्यावर, तर जवळपास १८ लाख हेक्टरच्यावर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. या पिकावरील किंडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकर्यांनी नियमित शेताचे सर्वेक्षण करावे, यासाठीचा सल्ला कृषी विभागाने दिला असून, ५0 टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध केली आहेत. पिवळा मोझ्ॉक या रोगामुळे या भागातील सोयाबीनची पाने पिवळी झाली आहेत. नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्ये कमी झाल्याने पाने पिवळी पडतात; मात्र पानाच्या शिरा हिरव्या राहतात. या अळ्य़ांचा प्रादुर्भावाने पिकांचे नुकसान होत असून, शेतकर्यांचा किटकनाशकांचा खर्च करावा लागत असल्याने अनुदान देण्यात येत आहे.