कीटकनाशक, खतांचा बेवारस माल जाळून पुरावा केला नष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:53 AM2017-12-28T01:53:48+5:302017-12-28T01:56:36+5:30
मूर्तिजापूर : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत व मूर्तिजापूर तालुक्यात येणार्या गोरेगाव (पु.म.) येथून एक किमी अंतरावरील सांजापूर शेतशिवारात कीटकनाशके व खतांचा माल बेवारस स्थितीत सापडला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २५ डिसेंबर रेाजी प्रकाशित होताच २६ डिसेंबरच्या रात्री तो माल अज्ञात इसमाने पेटवून देऊन पुरावाच नष्ट केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सांजापूर रेल्वे गेटपासून १00 फुटांवरील रोडच्या खाली हरभर्याच्या शेताजवळील एका खड्डय़ात मोठय़ा प्रमाणातील सार्थक कंपनीचा बोशन, सल्फर ९0 टक्के, मेटाडॉन, खताचे पाकीट, सार्थक क्रॉप टॉनिक, रोगजंतू सापळे (चाळणी) आणि लेबल नसलेल्या एक लीटरच्या केमिकल बाटल्यांचा समावेश होता. सदर बेवारस सापडलेल्या लाखो रुपये किमतीच्या मालाचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. त्यामुळे सदर मालाचा साठा कुणाच्या मालकीचा आहे, याविषयी ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता आपले बिंग फुटणार, या भीतीने सदर कृ षी मालाचा साठा अज्ञात इसमाने २५ डिसेंबर रोजी रात्रीला पेटवून देऊन पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या बेवारस कृ षी मालाविषयी कुणीही बोरगाव मंजू पोलिसांना माहिती देण्याचे अथवा तक्रार दाखल करण्याचे धाडस केले नाही. याबाबत बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी याबाबत आपणास काहीही माहीत नसल्याची माहिती व आपल्याकडे तक्रार आली नाही, असे सांगितले आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात अपहार झाला असल्याची चर्चा गावात सुरू होती. माल कोणी जाळला आणि सदरचा माल कोणाचा, याविषयी वृत्त लिहिस्तोवर माहिती मिळाली नाही. संबंधित विभागाने घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी गावात सुरू आहे.