पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला; तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:07+5:302021-01-20T04:19:07+5:30

अकाेला : गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा या खाद्यातेलांसोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. असे असताना ...

Petrol, diesel prices skyrocket; How come we don't feel anything though? | पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला; तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही?

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला; तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही?

Next

अकाेला : गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा या खाद्यातेलांसोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. असे असताना या वाढत्या महागाईच्या विराेधात राजकीय पक्ष रस्त्यावर आले हाेते मात्र त्यांच्या आंदाेलनांची तीव्रता सरकारपर्यंत पाेहचलीच नाही. जाेपर्यंत सामान्य जनता पेटून उठत नाही ताेपर्यंत सरकार लक्ष देणारच नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपसिथत हाेत आहे

पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर आंदोलने तीव्र हाेत असत. आता मात्र विरोधी राजकीय पक्ष किंवा एकही सामाजिक संघटना आपले कर्तव्य म्हणून आंदाेलने करताना दिसतात. दुसरीकडे सरकारच्या संवेदनशीलतेवर जनतेचा विश्वास उडाल्यानेच सामान्य जनता मात्र अशा दरवाढीविराेधात तीव्रतेने बाहेर येणे अपेक्षित असतानाही शांत दिसत आहे. दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गोरगरीब तथा सर्वसामान्य कुटुंबांमधील गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरानेही उच्चांकी पातळी गाठलेली आहे. यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. असे असताना दरवाढीच्या या प्रश्नावर विरोधी राजकीय पक्षांमधील कुणी पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा सामाजिक संघटनांनी अद्याप आंदोलनाची हाक दिलेली नाही.

दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम

सध्या तूर कापणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकरी शहराच्या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणत आहेत; मात्र डिझेलचे दर वाढल्याने वाहनमालक अधिकचे पैसे मागत आहेत.

पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषिमालाची ने-आण करणारे वाहनचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

काेट

जनतेने राजकीय पक्षांच्या आंदाेलनाकडे पक्षाचा इव्हेंट म्हणून पाहू नये. अशी आंदाेलने ही सर्व जतनेच्या हिताचीच असतात. त्यामुळे राेजचा जगण्याचा संघर्ष टाळायचा असेल तर अशा आंदाेलनात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आवश्यक आहे.

राजेंद्र पाताेडे, प्रवक्ता, वचित बहुजन आघाडी

काेट

जनेतेच्या मनात अशा प्रश्नांवर राग असताेच आणि आताही आहे, मात्र सरकारच्या कार्यक्षमतेवर संशय असल्याने जनता कदाचित मागे हटत असेल, मात्र याेग्य वेळी हा राेष प्रकट हाेताेच. महागाईच्या मुद्यावर तर जनता आक्रमक असतेच.

शिवा माेहाेड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

काेट

जनतेच्या मनातील असंताेष प्रकट करण्यासाठीच राजकीय पक्षांची आंदाेलने हे प्रातिनिधिक आहेत त्याची दखल सरकारला अनेकदा घ्यावी लागली आहे मात्र सध्याचे केंद्र सरकार हे अशा प्रश्नांवर संवेदनशील नाही. केवळ शब्दांचे बुडबुडे अन् आश्वासनाची खैरात हेच काम सरकार करत आहे.

महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस

Web Title: Petrol, diesel prices skyrocket; How come we don't feel anything though?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.