विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:37+5:302021-07-31T04:19:37+5:30
आवक कमी, खर्चात वाढ गत काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, प्रवासी वाहतूक ...
आवक कमी, खर्चात वाढ
गत काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, प्रवासी वाहतूक मर्यादित असल्याने स्वत:च्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो; परंतु पेट्रोलचा खर्च वाढल्याने अडचणी येत आहेत.
- आकाश दांदळे, वाहनमालक
पेट्रोल-डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. त्या तुलनेत विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०७ रुपयांवर पोहोचले असून, कोरोनाकाळात वाहनाचा वापर करावा लागत असल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे.
- सागर अग्रवाल, वाहनमालक
हा बघा फरक! (दर प्रतिलिटर)
विमानातील इंधन एटीएफ - ६० रुपये
पेट्रोल - १०७ रुपये
शहरातील पेट्रोल पंप - १३
दररोज लागणारे पेट्रोल - ४०,००० लिटर
शहरातील वाहनांची संख्या
दुचाकी -
चारचाकी -
कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेच्या ठिकाणी हजार
कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. नोकरदार वर्गाला तालुक्यात प्रवास करण्यासाठी स्वत:चे वाहन वापरावे लागते.
ग्रामीण भागातील एसटीच्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे लहानसहान कामांसाठीही वाहनांचा वापर करावा लागत आहे.
पूर्वी पेट्रोल स्वस्त असल्याने जिल्ह्यांतर्गत विविध कामांसाठी वाहनांचा वापर केला तरी साधारणत: पाचशे रुपये खर्च येत असे, आता जवळपास हजार रुपये खर्च येत आहे.