संत रविदास वाचनालयात फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:16 AM2021-04-12T04:16:44+5:302021-04-12T04:16:44+5:30
रेशनकार्ड समस्यांबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा कोला - स्थानिक जन सत्याग्रह संगठनने रेशनकार्ड प्रकरणांबाबत अकोला जिल्हा अधिकाऱ्याशी चर्चा केली. ...
रेशनकार्ड समस्यांबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
कोला - स्थानिक जन सत्याग्रह संगठनने रेशनकार्ड प्रकरणांबाबत अकोला जिल्हा अधिकाऱ्याशी चर्चा केली. रेशनकार्ड प्रकरणात कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही अन्यथा येत्या काळात जन सत्याग्रह संगठन लोकशाही मार्गावर आंदोलन करेल आणि आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वात निवेदन देताना मिर्झा इम्रान बेग,शेख वसीम, उबैद राही, मिर्झा नावेद बेग, इम्रान खान रब्बानी, सय्यद इमरानोद्दीन हे कार्यकर्ते उपस्थित होते.
नरसिमानंदवर कायदेशीर कारवाई करा
अकोला आल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच एमआयएमने निवेदन देऊन नरसिमानंद यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली कोणताही मनुष्य कोणत्याही धर्माबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करत असेल तर त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, हे पाहता नरसिमानंदांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अकोला एमआयएमचे शहराध्यक्ष अब्दुल मुनाफ यांनी निवेदनात केली आहे. यावेळी एमआयएमचे शहर नगरसेवक मोहम्मद मुस्तफा पहलवान, आसिफ अहमद खान, इरफान खान, इम्रान खान रब्बानी, मोहम्मद नासिर, मिर्झा नावेद बेग हे कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाने अकाेलेकरांची करमाफी करावी
अकोला अकोला महानगरपालिका टॅक्सची रक्कम राज्य शासनाने देऊन घर टॅक्स व दुकानाचा टॅक्स शासनाने माफ करावा, अशी मागणी भाजपा प्रवक्ता नगरसेवक गिरीश जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. कराेनामुळे करवसुली झाली नाही त्यामुळे महानगरपालिकेची परिस्थिती खराब झाली असून टॅक्सरुपी रक्कम शासनाने अकोला महानगरपालिका द्यावी व घर टॅक्स माफ करावा तसेच covid-19 संदर्भात मुकाबला करण्यासाठी अकोला महानगरपालिकेला मदत करावी, अशी मागणी जाेशी यांनी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याकडे केली आहे
मेमन दिवसावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाळी छत्री
अकोला..जागतिक मेमन दिन महानगरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अकोला कच्छी मेमन जमातच्या वतीने भरउन्हात रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करणाऱ्या वाहतूक पोलिसांना उन्हाळी छत्र्या वाटप करण्यात आल्या. स्थानीय पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सामाजिक अंतर राखत रविवारी संपन्न झालेल्या या छत्री प्रदान सोहळ्यात शहर पोलीस अधीक्षक सचिन कदम, एलसीबी इन्चार्ज सपकाल, जुलूस कमेटीचे अध्यक्ष हाजी मुदाम,अकोला कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया, सचिव सलीम गाझी, ॲड. मो. परवेज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्र्या कदम यांना सुपुर्द करण्यात आल्या.यावेळी जावेद जकारिया यांनी मेमन दिनाचे महत्व स्पष्ट केले
कार्यक्रमाला जमातचे हनीफ मलक,अज़ाज़ सूर्या, हाजी यासीन बचाव, हाजी फारूक भुरानी,वाहिद मुसानी, हासम सेठ ट्रस्टचे अध्यक्ष यासीन कपडया, फारूक चाहवान तनवीर खान, जावेद खान,नदीम खान, समीर खान,वसीम खान उपस्थित होते.