महिला कर्मचा-याचे शारीरिक शोषण

By admin | Published: March 18, 2017 02:39 AM2017-03-18T02:39:12+5:302017-03-18T02:39:12+5:30

आरोपीस अटक; मूर्तिजापूर शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

Physical abuse of women employees | महिला कर्मचा-याचे शारीरिक शोषण

महिला कर्मचा-याचे शारीरिक शोषण

Next

मूर्तिजापूर (जि. अकोला), दि. १७- एका शासकीय कार्यालयात अधिनस्त असणार्‍या कर्मचारी महिलेचे शारीरिक शोषण करणार्‍या कर्मचार्‍याविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, एका शासकीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वामन नामदेव घोडके (३२) रा. कोकणवाडी मूर्तिजापूर याने आपल्या अधिनस्त असणार्‍या कर्मचारी महिलेला लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी अनेक ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान, आरोपी वामन घोडके याने सदर महिलेचे ईल फोटो काढून ठेवले होते.
महिलेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला व सदर काढलेले फोटो इंटरनेटवर टाकणार असल्याची धमकीसुद्धा दिली. सदर प्रकारावरून आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने आज पोलीस स्टेशन गाठले. सदर प्रकार २0१५ पासून ते जानेवारी १७ पर्यंत चालला. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वामन घोडके याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ३७६ (ब), ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अश्‍विनी गायकवाड करीत आहेत.

Web Title: Physical abuse of women employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.