चिठ्ठी काढून करायचा चिमुकल्या मुलींवर शारीरिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 07:11 PM2018-03-26T19:11:55+5:302018-03-26T19:11:55+5:30

अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार पंचबंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत जुनगडे याच्या मुलीसोबत त्याच्याच घरी खेळायला-बागळायला येणाऱ्या १२ ते १५ वर्ष वयोगटातील तीन चिमुकल्या मुलींच्या नावाने चिठ्ठ्या काढून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Physical torture on girls by a youth | चिठ्ठी काढून करायचा चिमुकल्या मुलींवर शारीरिक अत्याचार

चिठ्ठी काढून करायचा चिमुकल्या मुलींवर शारीरिक अत्याचार

Next
ठळक मुद्देचंद्रकांत काशीनाथ जुनगडे (३५) याच्या घरी याच परिसरातील रहिवासी तसेच त्याच्या लहान मुलीच्या मैत्रिणी म्हणजेच तीन मुली खेळण्यासाठी येत होत्या. या तीन मुलींसोबत चंद्रकांत जुगनडे हा नराधमही खेळण्याचे नाटक करीत असे.या मुलींची एका चिठ्ठीवर नावे लिहून ती चिठ्ठी त्याच्याच मुलीला काढायला सांगायचा. ज्या मुलीचे नाव चिठ्ठीत आले, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार हा जुनगडे करीत होता.


अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार पंचबंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत जुनगडे याच्या मुलीसोबत त्याच्याच घरी खेळायला-बागळायला येणाऱ्या १२ ते १५ वर्ष वयोगटातील तीन चिमुकल्या मुलींच्या नावाने चिठ्ठ्या काढून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा नराधम रोज तीन मुलींच्या नावाने चिठ्ठ्या टाकत असे, जिचे नाव उचललेल्या चिठ्ठीत येईल, तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार क रीत असल्याचा खळबळजनक खुलासा या मुलींनी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
भावसार पंच बंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत काशीनाथ जुनगडे (३५) याच्या घरी याच परिसरातील रहिवासी तसेच त्याच्या लहान मुलीच्या मैत्रिणी म्हणजेच तीन मुली खेळण्यासाठी येत होत्या. या तीन मुलींसोबत चंद्रकांत जुगनडे हा नराधमही खेळण्याचे नाटक करीत असे. या मुलींची एका चिठ्ठीवर नावे लिहून ती चिठ्ठी त्याच्याच मुलीला काढायला सांगायचा. ज्या मुलीचे नाव चिठ्ठीत आले, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार हा जुनगडे करीत होता. ‘लप्पन-छप्पन’ या लहान मुलींच्या खेळाचे नाव देऊन त्याने या चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण सुरूकेले होते. या तीन मुलींच्या आईपैकी एका मुलीच्या आईने २३ मार्च रोजी दुपारी मुलगी घरी आल्यानंतर तिला कपडे बदलण्यास सांगितले. मात्र, मुलीने कपडे बदलण्यास नकार दिला. त्यामुळे तिची आई संतापाने तिच्यावर ओरडल्याने मुलीने तिच्यासोबत घडलेला अश्लील प्रकार आईला सांगितला. या तीन मुलींना खेळण्याच्या बहाण्याने रोज बोलावून यामधील एका मुलीची चिठ्ठी रोज उघडण्यात येत होती. ज्या मुलीचे चिठ्ठीत नाव निघेल, तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव या मुलीच्या आपबितीमधून समोर आले. नराधम चंद्रकांत जुनगडे याने या तीन मुलींचा शारीरिक छळ सुरू केल्याचे त्या मुलींच्या आईच्या लक्षात येताच, त्यांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार गजानन पडघन यांनी क्षणाचाही विलंब न लावता तीनही मुलींची विचारपूस केली. वास्तव समोर येताच चंद्रकांत जुनगडे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध मुलींचा शारीरिक अत्याचार करणे, विनयभंगासह धमकी देणे व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी चंद्रकांत जुनगडे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title: Physical torture on girls by a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.