वराहपालन राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:21+5:302020-12-25T04:15:21+5:30
नॉनकोविड रुग्णसंख्येतही वाढ अकोला : वातावरणातील बदलाचा आरोग्याला फटका बसत असून, साथीच्या आजारांतही वाढ होत आहे. अनेकांना सर्दी, खोकला, ...
नॉनकोविड रुग्णसंख्येतही वाढ
अकोला : वातावरणातील बदलाचा आरोग्याला फटका बसत असून, साथीच्या आजारांतही वाढ होत आहे. अनेकांना सर्दी, खोकला, तापीसह डोकेदुखी, कांजण्या, डोळे येणे यासारख्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयासह सर्वोपचार रुग्णालयातही नॉनकोविड रुग्णांची गर्दी वाढली आहे.
खानावळींमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाहीच
अकाेला : लॉकडाऊननंतर शहरातील खानावळी पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांची गर्दीही वाढली आहे. परंतु, या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे नियम पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषत: फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे खानावळीच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे.
फंगल इन्फेक्शनमुळे वाढली अनेकांची डोकेदुखी
अकोला: थंडी वाढल्याने त्वचा कोरडी पडून खास सुटण्याचा त्रास या दिवसांत अनेकांना होतो. मात्र, यासोबतच अनेकांमध्ये फंगल इन्फेक्शनचीही डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. तरुणांमध्ये या समस्येचे प्रमाण अधिक आहे. उपचार घेतल्यावरही फंगल इन्फेक्शनची समस्या पुन्हा उद्भवत असल्याने अनेक जण या आजाराने त्रस्त आहेत.