पिके बहरली; ९८ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:20+5:302021-07-21T04:14:20+5:30
जिल्ह्यात ९१.३६ टक्के क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या! मध्यंतरी काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित होते. पाऊस पडण्याची प्रतीक्षा लागली ...
जिल्ह्यात ९१.३६ टक्के क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या!
मध्यंतरी काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित होते. पाऊस पडण्याची प्रतीक्षा लागली होती; मात्र उशिरा का होईना, जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९१.३६ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.
मूग ९४ तर तूर ९५ टक्के पेरणी
दरवर्षी खरीप हंगामात सरासरी ३३६ हेक्टर क्षेत्रात पेरणी होते; परंतु यंदा ३७६ क्षेत्रात मका पिकाची पेरणी झाली आहे. तर मूग ९४ टक्के व तूर ९५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. उशिरापर्यंत पावसाचे आगमन न झाल्याने या पिकांना धोका निर्माण झाला होता.
सरासरी क्षेत्र
४,८३,२९१ हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र
४,४१,५२१ हेक्टर
पेरणी टक्क्यात
९१.३६ टक्के
मूर्तिजापूर, पातूर तालुक्यात कपाशीचा पेरा कमी!
जिल्ह्यात ८४ टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे. काही तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पेरणी झालेली आहे; परंतु मूर्तिजापूर व पातूर तालुक्यात कपाशीची पेरणी कमी झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यात ४१ तर पातूर तालुक्यात ५० टक्के कपाशीची पेरणी झाली.