पिंपळखुटा - आडगाव रस्ता चिखलात रुतला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:09+5:302021-08-28T04:23:09+5:30

पिंपळखुटा : स्वातंत्र्य मिळून दीडशे वर्षे पूर्ण झाली असताना काही खेडेगाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पातूर पंचायत समितीअंतर्गत ...

Pimpalkhuta - Adgaon road muddy! | पिंपळखुटा - आडगाव रस्ता चिखलात रुतला!

पिंपळखुटा - आडगाव रस्ता चिखलात रुतला!

Next

पिंपळखुटा : स्वातंत्र्य मिळून दीडशे वर्षे पूर्ण झाली असताना काही खेडेगाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पातूर पंचायत समितीअंतर्गत येत असलेले आडगाव (राहेर) हे गावसुद्धा अनेक वर्षांपासून रस्त्यापासून वंचित आहे. रस्ता अपूर्ण असल्यामुळे आडगाववासीयांना २५ किलोमीटर फिरून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.

पावसाळ्यामध्ये हा रस्ता बंद होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना चिखल तुडवित, तीन किलोमीटरवर असलेल्या पिंपळखुटा येथे शिक्षणासाठी जाणे-येणे करावे लागते. आडगाववासीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पिंपळखुटा येथे जाणे-येणे करावे लागते. परंतु रस्ता खराब असल्यामुळे आडगाववासीयांचे हाल होत आहेत. संबंधित बांधकाम विभागाने या विषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी आडगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

फोटो:

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली असताना, अद्यापपर्यंत आमच्या गावात रस्ता होऊ शकला नाही. ही मोठी खेदाची बाब आहे. बांधकाम विभागाने पिंपळखुटा-आडगाव रस्त्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल.

-श्रीधर अभिमन्यू पाचपोर, ग्रामपंचायत सदस्य, आडगाव (राहेर)

270821\img_20210826_133104.jpg

पिंपळखुटा ते अडगाव रस्त्याची पावसाळ्यात होत असलेली दैनीय अवस्था.

Web Title: Pimpalkhuta - Adgaon road muddy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.