अमावस्येनंतर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 05:21 PM2019-09-03T17:21:37+5:302019-09-03T17:22:15+5:30
अमावस्येपासून कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण वाढले असून,कपाशीचे नुकसान होण्यासह फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अकोला : सोयाबीनवरील पाच जातीच्या अळ्यांनी हल्ला केल्यानंतर आता अमावस्येपासून कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण वाढले असून,कपाशीचे नुकसान होण्यासह फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची पेरणी करण्यात अली असून,यातील विदर्भात १६ लाख ७० हजार हेक्टर, मराठवाडा १४ लाख ८० हजार तर खान्देशात ८ लाख ६० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी करण्यात आल्याने या कपाशीवर सुरू वातीला गुलाबी बोंडअळीने चाल केली. शासनाने मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी टाळण्यासाठी ३१ मेपर्यंत बीटी कपाशी बियाणे विक्रीवर बंदी टाकली होती.तथापि शेतकºयांना बीटी कपाशीचे बियाणे मिळाले व पेरणीही करण्यात आली. बियाणे कसे मिळाले,याबाबत कृषी विभाग संशयाच्या भोवºयात आहे.परंतु त्यांचा प्रादुर्भाव आता नियमित खरीप हंगामातील कपाशीवर येऊन पोहोचला असून,३१ आॅगस्ट अमावस्यापासून बोंडअळीने तोंडवर काढले आहे. मागील तीन वर्षापुर्वी बोंडअळीने कपाशीवर हल्ला केला होता.त्यामुळे जवळपास ५० टक्क्यांवर कपाशीचे नुकसान झाले होेते.कृषी विद्यापीठ व कृषीी विभागाच्यावतीने मागील दोन वर्ष शेतकºयांमध्ये जनजागृती केला. शेतकºयांनी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी विविध उपाय केले.त्यात कामगंध सापळेही लावण्यात आले होते.असे असताना मागच्यावर्षी काही जिनींग प्रेसींग फॅक्टरीत साठवलेल्या कपाशीत बोंडअळीचे पंतग आढळून आले होते.
बोंडअळ््यांना अंधार सुकर !
अंडे घालणे, प्रजनन किंवा पिकांंचे नुकसान करण्यासाठी बोंडअळीसाठी सुकर असतो.अंधारात त्या अधिक सक्रीय होतात.म्हणून अमावस्यांनतर कीड,अळीचा प्रादुर्भाव वाढतो ही सर्व सामान्य मान्यता असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.
बोंडअळीसाठी रात्र सुकर असते,तसेही आॅगस्ट,सप्टेंबर महिन्याच्या पंधावाड्यात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.सद्या कपाशीवर बोंडअळी आली आहे. यावर्षी ५ टक्के नॉनबीटीची पेरणी करण्यात आली आहे.त्यामुळे प्रथम त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल.शेतकºयांनी घाबरू न न जाता ५ टक्केच्यावर अळ््यांचे प्रमाण वाढले तरच फवारणी करावी अन्यथा करू नये.
- डॉ. अनिल कोल्हे,
मुख्य पीक संरक्षण अधिकारी,
किटकशास्त्र विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.