कपाशीवर बोंडअळी; कृषी शास्त्रज्ञांची उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:18 PM2018-08-06T14:18:28+5:302018-08-06T14:21:49+5:30
अकोला : शेकडो उपाययोजना करू नही यावर्षी गुलाबी बोंडअळीचे दर्शन झाल्याने कृषी विभागासह कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे.
अकोला : शेकडो उपाययोजना करू नही यावर्षी गुलाबी बोंडअळीचे दर्शन झाल्याने कृषी विभागासह कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. या अनुषंगाने विदर्भातील कपाशी क्षेत्रावर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत घेतला असून, सुरुवातीला अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाची निवड केली आहे. या गावात प्रात्यक्षिक कामाला रविवारपासून सुरुवातही करण्यात आली आहे.
मागीलवर्षी विदर्भातील कापूसपट्ट्यात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केल्याने यावर्षी कृषी विद्यापीठानेही दक्षता घेतली असून, कृषी विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना, शेतकºयांना मार्गदर्शनावर भर दिला जात आहे. बोंडअळीसोबतच कपाशीवर रसशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव अलीकडच्या काही वर्षात जास्त वाढल्याने यावर्षी या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दखल घेण्यात आली आहे. पण, या सर्व किडींना अनुकूल हवामान निर्माण झाल्याने यावर्षीही गुलाबी बोंडअळी समोर आली असून, अकोला जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात सुरुवातीलाच बोंडअळीचे दर्शन झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाºयांसह कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांची झोप उडली आहे. या अनुषंगाने बोंडअळी व रसशोषण करणाºया किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीला अकोला जिल्ह्यातील कौलखेड गोमासे येथील १८८ एकर व यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा (खुर्द) गाव शिवारातील १४५ एकर प्रक्षेत्रावर कापूस पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पारंपरिक पद्धतीने कापूस पिकाचे व्यवस्थापन न करता कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कापूस पिकाचे व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होईल, या दृष्टीने शेतकºयांना या प्रात्यक्षिक कार्यक्रमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गुलाबी बोंडअळी, रस शोषण करणाºया किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी कपाशी क्षेत्रावर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात येत असून, शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कापूस पिकाचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला मार्गदर्शनातून शेतकºयांना देण्यात येत आहे.
डॉ. दिलीप मानकर,
संचालक,
विस्तार शिक्षण,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.