पाइप लाइन फुटली; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By admin | Published: June 10, 2016 02:17 AM2016-06-10T02:17:24+5:302016-06-10T02:17:24+5:30

अकोला महापालिकेची पाइप लाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात.

Pipeline fungi; Millions of liters of water wastage | पाइप लाइन फुटली; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

पाइप लाइन फुटली; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

Next

अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर जकात नाक्याजवळ महापालिकेची पाइप लाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उजेडात आला. या प्रकाराची मनपाच्या जलप्रदाय विभागाला माहिती मिळताच बुधवारी पाइप लाइन दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली.
यंदा उन्हाळ्य़ात अकोलेकरांना प्रखर उन्हाचे चांगलेच चटके सहन करावे लागले. उन्हाच्या तीव्रतेमुळे महान धरणातील जलसाठय़ातसुद्धा कमालीची घसरण झाली. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहून मनपा प्रशासनाने पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल करून सात दिवसाआड अकोलेकरांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाण्याची नासाडी टाळून अकोलेकरांना पाणी बचतीचे वारंवार आवाहन केले. यादरम्यान, मे महिन्यात कान्हेरी सरप गावानजीक चांगेफळ फाटा येथे मनपाची मुख्य पाइप लाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली होती. धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने सर्वांंनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अशा स्थितीत मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर जकात नाक्याजवळ मनपाची पाइप लाइन फुटण्याचा प्रकार समोर आला. जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांना अवगत केले असता, त्यांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

Web Title: Pipeline fungi; Millions of liters of water wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.