जलवाहिनीसाठी खाेदला खड्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:59+5:302021-02-10T04:18:59+5:30
भाजपची दक्षिण मंडळाची बैठक अकाेला : शहरात संघटन बांधणीवर भर देण्याच्या अनुषंगाने मंगळवारी महानगर दक्षिण मंडळाच्या बैठकीचे आयाेजन करण्यात ...
भाजपची दक्षिण मंडळाची बैठक
अकाेला : शहरात संघटन बांधणीवर भर देण्याच्या अनुषंगाने मंगळवारी महानगर दक्षिण मंडळाच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. बैठकीला महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरचिटणीस संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, दक्षिण मंडळ सरचिटणीस मनिष बुंदेले, गोपाल मुळे, प्रफुल्ल कानकिरड, रघुवीर देशपांडे, नगरसेवक विजय इंगळे, रणजीत खेडकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते.
भीमशक्ती संघटनेसाठी निवड
अकाेला : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण गायकवाड व महानगराध्यक्षपदी आकाश सिरसाट यांची नियुक्ती भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी नागपूर येथे नियुक्तीचे पत्र देऊन केली. यावेळी पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप भोजराज, राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने आदी उपस्थित हाेते.
भाजपचे ‘युवा वाॅरिअर’संघटन
अकाेला : राज्यातील १८ ते २५ वयोगटांतील नवमतदारांना भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाविषयी आकर्षण आहे. अशा नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे ‘युवा वाॅरिअर’ असे नवे संघटन भाजपतर्फे उभे करण्यात येणार आहे. नव्या संघटन बांधणीसाठी भाजपच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, यामुळे युवकांना नवीन व्यासपीठ उपलब्ध हाेणार असल्याचा विश्वास पक्षातून व्यक्त केला जात आहे.
रस्त्यालगत मातीचे ढीग
अकाेला : जठार पेठ चाैकातून सातव चाैकाकडे येणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत ठिकठिकाणी मातीचे ढीग साचल्याचे चित्र आहे. विद्युत राेहित्राच्या अवतीभाेवती मातीचे ढीग कायम असताना, मनपाचे आराेग्य निरीक्षक काेणते कर्तव्य बजावत आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकाराची भाजप नगरसेवकांनी दखल घेऊन मातीचे ढिगारे उचलावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
महावितरणसमाेर रस्त्यात वाहने
अकाेला : रतनलाल प्लाॅटस्थित महावितरण कार्यालयासमाेरील मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जात असल्याचे समाेर आले आहे. यामुळे नेकलेस रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. शहरात रस्त्यालगत दुचाकी उभी केल्यास वाहतूक शाखेच्या टाेइंग पथकाकडून वाहन जप्तीची कारवाई केली जाते. त्यामुळे या पथकाने महावितरणसमाेरील चारचाकी वाहनांच्या जप्तीची कारवाइ करावी, अशी मागणी हाेत आहे.
खुले नाट्यगृह रस्त्यावर काेंडी
अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैक पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लास्टीक विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे, या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. मंगळवारी गर्दीमुळे या रस्त्यावर वाहतुकीची काेंडी झाल्याचे दिसून आले आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे.
जलवाहिनीच्या पाइपची पळवापळवी
अकाेला: ‘अमृत’याेजनेंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे बदलण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्यालगत उघड्यावर पाइप टाकले आहेत. यामधील सहा, आठ ते दहा इंच व्यासाच्या पाइपची नागरिकांनी पळवापळवी सुुरू केल्याची माहिती आहे. यामुळे जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराला अडचणीचा सामना करावा लागत आहे.