रस्त्यालगत खाेदला खड्डा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:22+5:302021-05-05T04:31:22+5:30
‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या!’ अकाेला : काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. १ ...
‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या!’
अकाेला : काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस घेता येणार आहे. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाेबतच उन्हापासून संरक्षण व पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
कोविडचे नियम न पाळणाऱ्यांवर राहणार पोलिसांचा वॉच!
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. हे नियम मोडणाऱ्यांवर जिल्हा पाेलीस दलाची चोख नजर राहणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध भागांत २८ पॉइंटची निर्मिती करण्यात आली असून, त्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत.
चाचणी करूनही अहवाल मिळेना
अकोला: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच अनेक जण शहरातील विविध केंद्रांवर कोविड चाचणी करीत आहेत. मात्र, यातील अनेकांना चाचणी अहवाल मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास तो नकळत अनेकांच्या संपर्कात येत आहे.
जीएमसीत रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढली असून, यामध्ये अनेक रुग्ण बाहेर गावातील आहेत. अशा रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांची सर्वोपचार रुग्णालय परिसरात गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.