सातव चौकात जलवाहिनीसाठी खड्डा खाेदला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:33+5:302021-04-08T04:18:33+5:30
----------------------- खरप बु. येथील वीजपुरवठा वारंवार खंडित अकोला: खरप बु. परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले ...
-----------------------
खरप बु. येथील वीजपुरवठा वारंवार खंडित
अकोला: खरप बु. परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजतारांना झाडांच्या फांद्या स्पर्श करीत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------
जिल्हा परिषदमध्ये अधिकारी सापडेना!
अकाेला: जिल्हा परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना संबंधित अधिकारी जागेवर सापडत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे प्रलंबित विषय कायम राहत अशा तक्रारी आहेत.
-----------------------
टाॅवर चाैकात अपघाताची शक्यता वाढली!
अकाेला : टाॅवर चाैकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ता बंद करण्यात आला आहे. टॉवर चौकात वाहनांची गर्दी होत असल्याने तसेच रस्ता बंद केल्यामुळे समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या सुमारास अपघात घडण्याची भीती आहे.
-----------------------
अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली!
अकोला : शहरातील जुने बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, टाॅवर चाैक, अकोट स्टँड, वाशिम बायपास या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. या प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ही वाहतूक निर्बंधपणे सुरू असल्याचे दिसत आहे.
------------------------------
‘शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करा!’
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील त्रुटीची दुरुस्ती करून याद्या अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांच्या संबंधित नायब तहसीलदारांना बुधवारी दिले.
---------------------------
पेट्रोलपंपांवर कोरोना नियमांचे उल्लंघन!
अकोला: कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ‘नो मास्क, नो पेट्रोल’ अशी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, आता या मोहिमेला हरताळ फासल्या जात आहे. कुठल्याही पेट्रोलपंपावर मास्कची विचारणा केली जात नाही. तसेच मास्क नसेल तर दंडात्मक कारवाईसुद्धा मंदावली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही मोहीम पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
--------------------------
सातवा वेतन आयोग ; शिक्षक वंचित!
अकोला : राज्य शासनाने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, कालबद्ध पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनापासून अनेक कर्मचारी वंचित असल्याचा आरोप महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने लक्ष देऊन शिक्षकांना लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
---------------------------
बसेस खिळखिळ्या; प्रवासी त्रस्त!
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसेसचे साहित्य उपलब्ध नसल्याने त्या आगारात नादुरुस्त आहे. त्यामुळे नवीन बसेस दाखल करण्याची मागणी होत आहे.
----------------------
आगारात सॅनिटाझेशन मशीन बसविण्याची मागणी
अकोला : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरजिल्ह्यातून शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आगारात सॅनिटायझेशन मशीन बसविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
----------------------------
अवैध वाहतुकीमुळे रस्ता जाम
अकाेला: शहरात उड्डाणपुलाचे निर्माणकार्य सुरू आहे. यादरम्यान, जनता भाजी बाजारसमाेर उड्डाणपुलाखाली अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी अनधिकृत थांबा निर्माण केल्याचे समाेर आले आहे. शहरालगतच्या गावात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही वाहने असली तरी यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराकडे वाहतूक शाखा पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
-----------------------------------------
बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा
अकाेला: शहरात निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या कामामुळे मध्यवर्ती बसस्थानकात जाणाऱ्या एसटी चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काेराेनामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र असून अशा स्थितीत बसस्थानक परिसराला अवैध वाहनधारकांनी विळखा घातल्याची बिकट परिस्थिती आहे.