बस स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:26+5:302020-12-30T04:24:26+5:30

धिंग्रा चाैकात धुळीचे साम्राज्य अकाेला : शहरातील अत्यंत गजबजलेला व वर्दळीचा चाैक असलेल्या मदनलाल धिंग्रा चाैकात रस्त्याची नियमित झाडपूस ...

Pit near the entrance of the bus station | बस स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत खड्डा

बस स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत खड्डा

Next

धिंग्रा चाैकात धुळीचे साम्राज्य

अकाेला : शहरातील अत्यंत गजबजलेला व वर्दळीचा चाैक असलेल्या मदनलाल धिंग्रा चाैकात रस्त्याची नियमित झाडपूस हाेत नसल्यामुळे या ठिकाणी मातीचे ढीग साचले आहेत. धुळीमुळे लघू व्यावसायिक, फेरीवाले व ऑटाेचालक त्रस्त झाले असून मनपाच्या स्वच्छता विभागाने पाठ फिरविल्याचे चित्र समाेर आले आहे.

बस स्थानकावर गर्दी; मास्क नाहीच!

अकाेला : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक व टाॅवर चाैकातील जुन्या बस स्थानकावर प्रवाशांची चांगलीच गर्दी हाेत असून काेराेना विषाणूच्या अनुषंगाने प्रवाशांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. तसे हाेत नसून ताेंडाला रूमाल, मास्क न लावताच प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसत आहे.

जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय

अकाेला : जुने शहरातील डाबकी राेडवरील संत श्री गजानन महाराज मंदिरासमाेर जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याची नासाडी हाेत आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने खड्डा खाेदला असून ताे मुख्य रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

मनपाकडून व्हाॅल्व दुरुस्ती सुरू

अकाेला : महान येथील ६५ एमएलडी प्लांटवरून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा व्हाॅल्व खदान पाेलीस स्टेशनजवळ असून ताे नादुरुस्त झाला आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर झाला आहे. ही बाब लक्षात घेता मनपाच्या जलप्रदाय विभागाने मंगळवारी व्हाॅल्व दुरुस्तीला सुरुवात केली.

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अकाेला : शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या किरकाेळ दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जुन्या शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून उर्वरित भागात बुधवारपासून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

खदानला अतिक्रमणाचा विळखा

अकाेला : सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या खदानला स्थानिक रहिवाशांनी विळखा घातला आहे. खदानच्या जागेत माती, केरकचऱ्याचा भराव घालून त्यावर पक्क्या घरांचे अतिक्रमण उभारण्यात आले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे सांडपाण्यासह साफसफाईच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे महसूल विभाग व मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.

श्रीकृष्ण द्वारसमाेर रस्त्यात पार्किंग

अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकपर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लास्टीक विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. चक्क रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून चालणेही मुश्कील झाले आहे. यामुळे अकाेलेकर त्रस्त असतानाही मनपाकडून कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे.

काेंडवाडा विभागाचे वाहन बंद

अकाेला : शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेत माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे दिसून येते. तसेच गल्लीबाेळात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. माेकाट जनावरांना पकडण्यासाठी मनपाच्या काेंडवाडा विभागाकडे वाहन उपलब्ध असले तरी सदर वाहन मागील काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याची माहिती आहे.

थाेर पुरुषांचे पुतळे दुर्लक्षित

अकाेला : तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शहराच्या मध्यभागातील प्रमुख चाैकांमध्ये थाेर पुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र आज राेजी थाेर पुरुषांचे पुतळे धुळीने माखल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title: Pit near the entrance of the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.