अकोट-तेल्हारा रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:54+5:302021-05-23T04:17:54+5:30

-------------------- नांदखेड ते व्याळा रस्त्याचे काम धिम्या गतीने बाळापूर : गत वर्षापासून धिम्या गतीने सुरू असलेल्या नांदखेड ते ‌व्याळा ...

Pits on Akot-Telhara road | अकोट-तेल्हारा रस्त्यावर खड्डे

अकोट-तेल्हारा रस्त्यावर खड्डे

Next

--------------------

नांदखेड ते व्याळा रस्त्याचे काम धिम्या गतीने

बाळापूर : गत वर्षापासून धिम्या गतीने सुरू असलेल्या नांदखेड ते ‌व्याळा या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यास बांधकाम कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे अपघात बळावले आहेत. रस्त्यावर गिट्टीचे साम्राज्य असल्याने दुचाकी घसरून अपघात घडत आहेत.

-------------------------

कार्यालयांमध्ये तक्रारपेट्यांची मागणी

पातूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकाविलेल्या दिसायच्या. मात्र या तक्रारपेट्या आता गायब झाल्या आहेत.

-------------------------

ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात

बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पोलिसांना माहिती असली तरी कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.

-------------------------------

चोहोट्टा येथील प्रवासी निवारा शोभेचा

चोहोट्टा : अकोट-अकोला या मार्गावर असलेला चोहोट्टा बाजार येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनला आहे. बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्यामुळे परिसरातील गावातील प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहून गैरसोयीचा सामना करावा लागतो.

--------------------------

टाकळी खुरेशी येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

बाळापूर : तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथे प्रवासी निवारा झाल्यास याचा फायदा गाव परिसरातील नागरिकांना होेऊ शकतो. प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.

-------------------------

डासांचा प्रादुर्भावामुळे आरोग्य धोक्यात

तेल्हारा : गावात तसेच परिसरात डासांसह लहान किड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

---------------------------------------

वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींत रोष

वाडेगाव: जिल्ह्यातील बऱ्याच मार्गांवर विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. जिल्ह्यात रस्ता कामात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. नवीन झाडांचे संगोपन व्यवस्थित केले जात नाही. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

-------------------------------------------

मोबाइलचा अतिवापर ठरतोय धोकादायक

हिवरखेड : नागरिकांना मोबाइल जीव की प्राण झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात खेळण्याप्रमाणे स्मार्टफोन, सुपरफोन दिसतात. मोबाइलचा हा अतिवापर आजारांना जन्म देणारा ठरत आहे. कानासह डोळे व डोक्याचे आजार जडत आहेत. यात बालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

------- ----------------------------------

बाजारपेठेत सुट्या पैशांचा तुटवडा

मूर्तिजापूर : ग्रामीण भागात नोटाबंदीनंतर चिल्लरचा कमालीचा तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना अडचण येत आहे. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने नागरिकांना भटकावे लागत आहे. चिल्लर नसल्याने दुकानदार, ग्राहक दोघांनाही फिरावे लागते.

Web Title: Pits on Akot-Telhara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.