पांढुर्णा-आलेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:52+5:302021-02-26T04:24:52+5:30
------------------------------- नांदखेड टाकळी येथे कोरोनाचा शिरकाव बाळापूर : तालुक्यातील नांदखेड टाकळी येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून, एका जणांचा अहवाल ...
-------------------------------
नांदखेड टाकळी येथे कोरोनाचा शिरकाव
बाळापूर : तालुक्यातील नांदखेड टाकळी येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून, एका जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने गावात जनजागृती करण्याची मागणी होत आहे.
------------------------------------
बार्शीटाकळी तालुक्यात आणखी तीन पॉझिटिव्ह
बार्शीटाकळी : तालुक्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
----------------------------------
पिंजर येथील आरोग्य केंद्राचे सहा कर्मचारी पॉझिटिव्ह
पिंजर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत.
----------------------
संत गाडगेबाबांना अभिवादन
बार्शीटाकळी : शहरातील अल्फलाह उर्दू प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक अलिमोद्दीन बेपारी व शाहीद इकबाल खान सरफराज खान यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
------------------------------------
आलेगाव परिसरात अवैध वृक्षतोड वाढले
पांढुर्णा : आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत अवैध वृक्षतोड वाढली आहे. वनविभागाने नुकतेच सागवानाचे ९ नग जप्त केले आहेत. या परिसरात वनविभागामार्फत गस्त वाढविण्याची मागणी वृक्षप्रेंमीकडून होत आहे.
----------------------
माना येथे सांडपाणी रस्त्यावर स
माना : मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहेत.
--------------------------------
चिखलगाव येथे वीज पुरवठा वारंवार खंडित
चिखलगाव : चिखलगाव येथे यंदा रबी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. सध्या शेतात पिके बहरली आहेत. पिकांना पाण्याची आवश्यकता असून, वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
----------------------------------
चोहोट्टा बाजार-अकोट रस्त्यावर धूळ
चोहोट्टा बाजार : अकोट-चोहोट्टा बाजार रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अपघाताची भीती वाढली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांवर धूळ साचून पिकांचे नुकसान होत आहे.
-------------------------------
खानापूर परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात
खानापूर : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने खानापूर शिवारात रब्बी हंगामाचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. यंदा परिसरातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिली आहे. सध्या परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली असून, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
---------------------------------
वाडेगाव येथील पुलावर कठडे नाहीत
वाडेगाव : वाडेगाव-देगाव रस्त्यावर असलेल्या पुलावर कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या मार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुलावर कठडे बसविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
----------------------------