कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करा, आम्ही सहकार्य करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:43+5:302021-04-20T04:19:43+5:30

जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णवाहिकांची देखभाल तसेच अपुरे मनुष्यबळ आदी विषयांवर चर्चा ...

Plan for corona control, we will cooperate! | कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करा, आम्ही सहकार्य करू!

कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करा, आम्ही सहकार्य करू!

Next

जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णवाहिकांची देखभाल तसेच अपुरे मनुष्यबळ आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी भाजपा आमदारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आमदार रणधिर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील परिस्थिती अजून हाताबाहेर गेली नसून योग्य नियोजन केल्यास आरोग्य यंत्रणा चांगली होऊ शकते. जिल्ह्यात खाटा उपलब्ध असून मनुष्यबळाची निर्मितीही शक्य आहे. ऑक्सिजनची मोठी समस्या आहे. यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच शासकीय रुग्णवाहिकांचे टायर बदलवून त्या रुग्णांच्या सेवेत आणाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गरज भासल्यास त्यासाठी आर्थिक सहकार्यही करू, अशी ग्वाहीदेखील यावेळी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कोविड सेवेत घेण्याची मागणीही यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना केले. त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

Web Title: Plan for corona control, we will cooperate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.