योजना कागदावर; शेतकरी वा-यावर!

By Admin | Published: April 8, 2016 02:13 AM2016-04-08T02:13:29+5:302016-04-08T02:13:29+5:30

पैसा शासनाच्या तिजोरीत पडून; बळीराजा झिजवतो आहे कार्यालयांचे उंबरठे.

On plan paper; Farmer on-the-road! | योजना कागदावर; शेतकरी वा-यावर!

योजना कागदावर; शेतकरी वा-यावर!

googlenewsNext

अकोला: शेतकर्‍यांसाठी कृषीविषयक योजना राबविण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असली तरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त योजना केवळ कागदावरच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या पाहणीच्या निमित्ताने समोर आले आहे. विहीर, साहित्य वितरण, अनुदानासह इतरही योजनांचा लाभ न मिळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात घट होत आहे. बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबविते. जिल्हा परिषद स्तरावरून राबविण्यात येणार्‍या ११९.५0 लाखांच्या योजना रखडल्या आहेत. काही अधिकारी-कर्मचार्‍यांकडून कधी तांत्रिक कारण पुढे करून, तर कधी पैशांची मागणी करण्यात येत असल्याने शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. विहिरीशी संबंधित योजनांमध्ये तर शेतकरी कर्ज काढून विहीर बांधतो, स्वत: राबतो; मात्र नंतर पैसे मिळण्यासाठी त्यांच्यावर शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. काही वेळा तर त्याने खर्च केलेली संपूर्ण रक्कमही त्याला मिळत नाही. त्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: On plan paper; Farmer on-the-road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.