अकोला जिल्ह्यात ७० पाणंद रस्ते कामांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:07 PM2020-03-01T12:07:19+5:302020-03-01T12:07:31+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.
अकोला : जिल्ह्यात ७० पाणंद रस्ते कामांचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दहा पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत प्रत्येकी दहा याप्रमाणे ७० पाणंद रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या सहभागातून पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकसहभागातून पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले.