जिल्हयात ९८ पाणंद रस्ते कामांचे नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:14+5:302021-04-24T04:18:14+5:30
अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्हयात ९८ पाणंद रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे ...
अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्हयात ९८ पाणंद रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात शेतात जाणे येण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी ९८ पाणंद रस्ते कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. माती आणि मुरूमचा वापर करून पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ९८ पाणंद रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून, लवकरच पाणंद रस्ते कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायती आणि गाव शिवारातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
’डीपीसी’तून ५.१५ कोटींचा
निधी उपलब्ध!
जिल्ह्यात ९८ पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) ५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, उपलब्ध निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाडवे यांनी सांगितले.