स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रमांचे नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:23 AM2021-08-22T04:23:17+5:302021-08-22T04:23:17+5:30
----------- कोरोनाने कुणाचा भाऊ, तर कुणाची बहीण हिरावली! आम्ही राखी बांधायची कुणाला?: बहिणीची व्यथा अकोला: राखी पौर्णिमा हा सण ...
-----------
कोरोनाने कुणाचा भाऊ, तर कुणाची बहीण हिरावली!
आम्ही राखी बांधायची कुणाला?: बहिणीची व्यथा
अकोला: राखी पौर्णिमा हा सण देशभरात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी दि. २२ ऑगस्ट रोजी हा सण साजरा होत आहे. कोरोनाने कुणाचा भाऊ, तर कुणाची बहीण हिरावली आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाला आम्ही राखी बांधायची कुणाला? अशी व्यथा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भाऊ गमावलेल्या बहिणींमधून राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. मार्च ते मेदरम्यान दुसऱ्या लाटेने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढला होता. या लाटेत दररोज दीड ते दोन हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. या लाटेत केवळ रुग्णांचाच आकडा वाढला नाही, तर कोरोनामुळे मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढली होती. अनेक मुलांवरील आई-वडिलांचे छत्र कोरोनाने हिरावले, तर काहींनी भाऊ, बहीणही गमावली. बहीण-भावाचा सण राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला कोरोनाकाळात भाऊ गमावलेल्या एका बहिणीने भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
--------------------------------------------
कोरोनात आम्ही खूप काही गमावलं!
आईचा दर्जा असणारी बहीण दरवर्षी राखी बांधायची. या कोरोनामुळे आम्ही खूप काही गमावलं आहे. कोरोनाने बहीण हिरावल्याने छत्र हरपल्याच्या भावना युवकाने ‘लोकमत’कडे राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केल्या.
---------------------------------------
माझा भाऊ दरवर्षी माझ्या घरी यायचा!
आतापर्यंत असा एकही रक्षाबंधन सण झाला नाही की, माझा भाऊ माझ्या घरी आला नाही. माझे लग्न झाल्यापासून प्रत्येक रक्षाबंधन सणाला माझा भाऊ राखी बांधण्यासाठी माझ्या घरी येत होता; मात्र मे महिन्यात कोरोना कसा आला आणि माझ्या भावाला क्षणात घेऊन गेला, हे समजलेच नाही. यंदाचा पहिलाच असा रक्षाबंधन सण आहे की माझा भाऊ माझ्यासोबत नाही.
-एक बहीण.
------------------------------