पावसाळ्यापूर्वी संपूर्ण कापूस खरेदीचे नियोजन; दैनंदिन शेतकरी संख्या वाढविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 04:12 PM2020-05-24T16:12:56+5:302020-05-24T16:13:04+5:30
दैनंदिन कापूस खरेदीसाठी शेतकºयांच्या गाड्यांची संख्या वाढवून प्रत्येक केंद्रासाठी नियोजन करून दिले आहे.
अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला कापूस पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्यासाठी प्रत्येक केंद्रात दरदिवशी किमान २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास ७० टक्के शेतकºयांचा कापूस घरातच राहणार आहे. हा प्रकार टाळण्यासाठी आता पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार सहकारी उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दैनंदिन कापूस खरेदीसाठी शेतकºयांच्या गाड्यांची संख्या वाढवून प्रत्येक केंद्रासाठी नियोजन करून दिले आहे. सोबतच शेतकºयांना कापूस विक्रीसाठी २६ मेपर्यंत नोंदणी करता येईल, असे आवाहनही केले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग, प्रेसिंग युनिट सुरू झालेले नव्हते. कापूस खरेदीकामी काही जिनिंग, प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच किरकोळ कारणाने काम बंद ठेवत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सातत्याने झाल्याने यापुढे असा प्रकार घडल्यास युनिटधारकांविरुद्ध कारवाई करण्यासोबतच लायसन रद्द केले जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आधीच दिला. सोबतच पालकमंत्री कडू यांनीही २१ मे रोजीच्या बैठकीत निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही शेतकºयाचा कापूस घरात राहणार नाही, असे बजावले आहे. शेतकºयांना नोंदणीसाठी मुदतही वाढवून देण्यात आली आहे. तसेच कापूस खरेदी केंद्रातून किमान दोन दिवस आधीच त्यांना तसा निरोप द्यावा, असेही बजावण्यात आले आहे. नियोजनाप्रमाणे खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस गाड्यांची संख्या ठरवून दिली आहे. त्यामध्ये ‘सीसीआय’च्या अकोला तालुक्यातील चिखलगाव येथे १०० तर २६ मेनंतर ३०० शेतकरी संख्या ठरली आहे. पातूर-५०, बार्शीटाकळी-१५० तसेच शेतकºयांचा कापूस खरेदी करून २९ मे रोजी केंद्रातील खरेदी बंद केली जाणार आहे. अकोट-३००, हिवरखेड-५०, मूर्तिजापूर-१५०, बाळापूर-५०, पणन संघाच्या केंद्राच्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, कानशिवणी-१००, तेल्हारा-५०, (अतिरिक्त ग्रेडर मिळाल्यानंतर २०० प्रति दिन) या नियोजानुसार ‘सीसीआय’कडून दैनंदिन ८५० शेतकरी तर पणन महासंघाकडून १५० शेतकºयांचा कापूस खरेदी केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.