तीन मिनिटात केली ४ हजार वृक्ष लागवड

By admin | Published: July 2, 2017 09:24 AM2017-07-02T09:24:43+5:302017-07-02T09:24:43+5:30

अकोला जिल्ह्यातील उपक्रम

Planted 4 thousand trees made in three minutes | तीन मिनिटात केली ४ हजार वृक्ष लागवड

तीन मिनिटात केली ४ हजार वृक्ष लागवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला(जि. अकोला) : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शिर्ला येथील शहीद कैलास निमकंडे वन उद्यानात तीन मिनिटात ४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
शिर्ला येथील रेशीम विकास केंद्र, शहीद सैनिक भूमी, श्रीकांत पर्वत येथे एकूण ४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. सर्व ठिकाणी विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पिकासाठी एकवटलेल्या शिर्ला गावाचे हिरवे स्वप्न नक्कीच साकारेल. विकासासाठी जिल्हा प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे, असे अभिवचन अकोला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी मार्गदर्शन करताना गावकऱ्यांना दिले. अकोला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, बाळापूर विधानसभा आमदार बळीराम सिरस्कार, उपवनसंरक्षक विजय माने, बाळापूर एसडीओ प्रा. संजय खडसे, पातूर तहसीलदार आर. जी. पुरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, सभापती सविता धाडसे, रेंज फॉरेस्ट आॅफिसर जी. डी. देशमुख, भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे जनक ए. एस. नाथन, जिल्हा रेशीम अधिकारी संजय शिंदे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, गटशिक्षणाधिकारी भटकर, स्टेट बँक आॅफ इंडियाचे कौस्तुभ, पाणी फाउंडेशनचे सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे, सरपंच रिना संजय शिरसाट, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, सुवर्ण नदी प्रकल्पाचे सचिन कोकाटे, प्रकाश अंधारे यांनी वृक्ष लागवड केली.
शिर्ला गावाने हिरवागार शिर्ला करण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटात ४ हजार वृक्ष लागवड करण्याचा विक्रम गावाने केला. त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. गावाने आज रेशीम विकास केंद्र, शहीद सैनिक भूमी, श्रीकांत पर्वत येथे एकूण ४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. सर्व ठिकाणी विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

शिर्ला वेगळी ओळख निर्माण करीत आहे - बळीराम सिरस्कार
शिर्ला गाव विकासकामासाठी माझ्या मतदारसंघात ओळखले जाते. गावाने लावलेली ४ हजार झाडे जगवून त्याचा वाढदिवस पुढील वर्षी करावयाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी गाव यशस्वीपणे पार पाडेल, यात शंका नाही, असे सांगितले. यावेळी बाळापूर विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ह्यझाडे लावा, झाडे जगवाह्ण या आशयाचे समूहगीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले. उपस्थित सर्वांनी साद घातली.

Web Title: Planted 4 thousand trees made in three minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.