उमरा येथे मान्सून पूर्व कपाशीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:21+5:302021-06-10T04:14:21+5:30
काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीचे बीज अंकुरले असून, तासावर लागले आहे. कृषी विभागाने उन्हाळ्यात मे महिन्यात जास्त तापमान असल्यामुळे मे ...
काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीचे बीज अंकुरले असून, तासावर लागले आहे. कृषी विभागाने उन्हाळ्यात मे महिन्यात जास्त तापमान असल्यामुळे मे महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये कपाशीची लागवड करावी. असा सल्ला शेतकरी बांधवांना दिला होता. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवडीची शेतकऱ्यांनी सुरुवात केली. उमरा शिवारात ४० ते ५० हेक्टर कपाशीची लागवड करण्यात येते तर काही शेतामध्ये उन्हाळ्यापासून पीक वाचविण्यासाठी ठिबकच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येतो. उमरा, बेलुरा, जितापूर, शहापूर, शिवपूर, मक्रमपूर, बोर्डी, लाडेगाव आदी भागात कपाशीची लागवड करण्यात आली. आहे. कपाशीपासून यावर्षीही मोठ्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. कपाशी लागवडीला २० ते २५ हजारापर्यंत खर्च येतो. मागील दोन वर्षांपासून बोंडअळीमुळे नुकसान झाले. यावर्षी चांगल्या उत्पादनाची आशा आहे. असे शेतकरी अशोक सदाफळे यांनी सांगितले.