उन्हाळी मक्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:23+5:302021-04-02T04:18:23+5:30
अकोला : उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी मका पिकाची लागवड होण्याचा ...
अकोला : उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी मका पिकाची लागवड होण्याचा अंदाज होता. यामध्ये वाढ झाली असून २७९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी मका पिकाची लागवड झाली आहे.
--------------------------------------------
तुरीच्या दरावर होणार परिणाम
अकोला : बाजार समितीत तुरीला सरासरी ६४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. केंद्र सरकारने चार लाख टन तूर आयातीला परवानगी दिली आहे. या निर्णयाचा परिणाम तुरीच्या दरावर होणार असल्याची शक्यता आहे.
-----------------------------------------------
भाजीपाला पिकाला उन्हाचा फटका
अकोला : उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमानाचा भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. काही पिके करपल्याच्या स्थितीत दिसून येत आहेत.
------------------------------------------------
जिल्ह्याला ७८ हजार मे. टन साठा
अकोला : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्याला ७७,९९० मेट्रीक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ९५ हजार ७०० टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी संचालकांकडे केली होती.