पिच्याक सिल्याटच्या खेळाडूंनी लॉकडाऊनमध्ये लावली झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:21+5:302021-03-04T04:33:21+5:30

लॉकडाऊन लागल्यामुळे मार्शल आर्ट वर्ग आणि शाळा बंद पडल्या. विद्यार्थी शिक्षण ऑनलाइन घेत आहेत; परंतु मार्शल आर्टचा सराव करीत ...

Plants planted in lockdown by Pichak Sylhet players! | पिच्याक सिल्याटच्या खेळाडूंनी लॉकडाऊनमध्ये लावली झाडे!

पिच्याक सिल्याटच्या खेळाडूंनी लॉकडाऊनमध्ये लावली झाडे!

Next

लॉकडाऊन लागल्यामुळे मार्शल आर्ट वर्ग आणि शाळा बंद पडल्या. विद्यार्थी शिक्षण ऑनलाइन घेत आहेत; परंतु मार्शल आर्टचा सराव करीत आहे. यामधील काही खेळाडू उच्च पातळीवर खेळलेले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सर्वांना सावली व ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे ‘झाडे लावा... झाडे* जगवा... जीवन वाचवा...’ असा संदेश देत सर्वाना एक झाडे* लावण्याचा संदेश दिला आहे. या उपक्रमामध्ये नव्या बोंद्रे, मिताली राठी, निराली राठी, प्राची गोरे, प्रज्ञा गोरे, बसवराज दसोडे, दयानंद दसोडे, पूर्व गोरे, संस्कृती कोकाटे, हर्षवर्धन दसोडे, स्वराज गलांडे, इंगळे, गायत्री रंदे, कृष्णल कुलट व इतर खेळाडूंनी विविध झाडे* लावली. जिल्हाअध्यक्ष रवींद्र मालखेडे, सचिव तथा प्रशिक्षक आकाश धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला.

फोटो:

Web Title: Plants planted in lockdown by Pichak Sylhet players!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.