प्लाझ्मा दान करण्यासाठी समाेर यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:53+5:302021-04-25T04:18:53+5:30
वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण अकाेला : जिल्ह्यासह शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा फैलाव झाला असून काेराेना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला ...
वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण
अकाेला : जिल्ह्यासह शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा फैलाव झाला असून काेराेना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याचे परिणाम समाेर आले आहेत़ दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता निर्माण झाली असून वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण आल्याचे चित्र आहे़ रुग्णसंख्या वाढल्याने यंत्रणा सैरभैर झाली आहे़
ऑक्सिजनसाठी रुग्णालयांची धावपळ
अकाेला : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर नागपूर, नांदेड, हिंगाेली, वाशिम, बुलडाणा, अमरावती तसेच मध्य प्रदेशातूनही काही रुग्ण दाखल हाेत आहेत़ यामुळे वैद्यकीय यंत्रणांवरील ताण वाढला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे़ ऑक्सिजनसाठी रुग्णालयांची धावपळ हाेत आहे़
भर उन्हातही पाेलिसांकडून तपासणी
अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी नागरिक पुढाकार घेत नसल्याचे पाहून राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मुभा असून त्यानंतर घराबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे़ अशावेळी पाेलिसांकडून भर उन्हातही घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांची चाैकशी व वाहनांची तपासणी केली जात आहे़
लसीकरणासाठी पुढाकार घ्या !
अकाेला : शहरातील ४५ वर्ष वयोगटातील व त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांनी काेराेना लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेहऱ्यावर मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
काेराेनाचे नियम पायदळी
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.
पाण्यासाठी जनावरांची भटकंती
अकाेला : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने जीवाची लाही लाही हाेत आहे़ अशावेळी शहरात माेकाट जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध हाेत नसल्याने त्यांची गैरसाेय हाेत आहे़ शहरातील प्राणी मित्रांनी पुढाकार घेऊन माेकाट जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करून देण्याची गरज प्रकर्षाने समाेर आली आहे़