गोरक्षणच्या मार्ग दुभाजक सिमेंट कठड्यावर प्लास्टरिंग

By admin | Published: July 3, 2017 01:42 AM2017-07-03T01:42:42+5:302017-07-03T01:42:42+5:30

जर सिमेंट कामाचा दर्जा चांगला असेल, तर त्यावर कोणतेही प्लास्टरिंग न करता थेट रंग काम करण्याची वेळ यायला हवी होती; मात्र गोरक्षणमार्गावरील दुभाजक कठड्यावर प्लास्टरिंग होत आहे.

Plastering on the way of the Goraiwadi divider cement rugs | गोरक्षणच्या मार्ग दुभाजक सिमेंट कठड्यावर प्लास्टरिंग

गोरक्षणच्या मार्ग दुभाजक सिमेंट कठड्यावर प्लास्टरिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नव्याने तयार होत असलेल्या गोरक्षणच्या काँक्रिट मार्गावरील दुभाजक कठड्यावर प्लास्टरिंग होत आहे. जर सिमेंट कामाचा दर्जा चांगला असेल, तर त्यावर कोणतेही प्लास्टरिंग न करता थेट रंग काम करण्याची वेळ यायला हवी होती; मात्र हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप काही जाणकार मंडळीकडून होत आहे.
महानगरातील नेहरू पार्क ते गोरक्षण मार्गाचे सिमेंट-काँक्रिटीकरण झाले असून, आता सिमेंटचे दुभाजक उभारले जात आहे. लोखंड सिमेंटने तयार होत असलेल्या या दुभाजकांचा दर्जा ऐवढा चांगला ठेवायचा असतो की त्यावर थेट रंगकाम केले जाते; मात्र या मार्गावरील या दुभाजकचा दर्जा घसरल्याने त्यावर प्लास्टरिंग केल्या जात आहे.
आरसीसीच्या बांधकामार रेतीचा पोतारा जास्त दिवस टिकणार नाही, त्यामुळे काही दिवसांतच रेती पडून जाईल. पर्यायाने हे दुभाजक मजबूत नसणार, असे नागरिकांचे मत आहे.

महानगरातील या कामाच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. प्लास्टरिंग होत आहे का, पाहावे लागेल. कंत्राटदाराकडूनचुकीचे काम होत असेल, तर कारवाई होईल.
-मिथिलेश चौहान,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.

Web Title: Plastering on the way of the Goraiwadi divider cement rugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.