प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त; मनपाची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:22 PM2019-03-16T14:22:30+5:302019-03-16T14:22:53+5:30
अकोला: शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अकोला: शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा, नाल्या, गटारे आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नाले-गटारांमधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी प्लास्टिक पिशव्या अडसर ठरत आहेत. ही बाब लक्षात घेता मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्व, पश्चिम व उत्तर झोन क्षेत्रातील रेल्वेस्थानक परिसरातील शेर ए पंजाब, जैन रेस्टॉरंट, दावत होटल, मुदीना सोनी शॉपी, द कोर्टयार्ड प्रतिष्ठान तसेच गांधी चौक येथील ईगल वाईन बार आदींची तपासणी केली असता, शासनाने बंदी घातलेल्या नॉन वोवन पॉली प्रापीलीन बॅगचा साठा आढळून आला. याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तसेच परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्या रेल्वेस्थानक परिसरातील होटल आशीर्वादला एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, आरोग्य निरीक्षक शैलेश पावर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.
तीन महिन्यांचा कारावास!
शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरणाºया व्यावसायिकांवर पहिल्यांदा पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. दुसºयांदा १० हजार रुपये आणि तिसºयांदा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास, अशी तरतूद केली. आजपर्यंत मनपा प्रशासनाने थातूरमातूर कारवाया करून वेळ मारून नेल्याचे दिसून येते. आजपर्यंत कारावासाची शिक्षा होईल, अशी एकही कारवाई मनपा किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही, हे येथे उल्लेखनीय.