अकोला रेल्वेस्थानकावर ५० रुपयांत मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:15+5:302021-03-07T04:17:15+5:30

कोरोना विषाणू महामारीच्या पृष्ठभूमीवर गतवर्षी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत विशेष गाड्या चालवून प्रवासी ...

Platform tickets will be available at Akola railway station for Rs 50 | अकोला रेल्वेस्थानकावर ५० रुपयांत मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

अकोला रेल्वेस्थानकावर ५० रुपयांत मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

Next

कोरोना विषाणू महामारीच्या पृष्ठभूमीवर गतवर्षी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत विशेष गाड्या चालवून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तथापि, या गाड्यांमधून केवळ कन्फर्म तिकिटावरच प्रवास करता येतो. या काळात फलाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही बंदच करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोबत येणाऱ्यांना फलाटांवर जाता येत नव्हते. केवळ प्रवासाचे आरक्षित तिकीट असलेल्यांनाच फलाटांवर जाता येत होते. आता मात्र मध्य रेल्वेने काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ मंडळाअंतर्गत अकोला, शेगाव, बडनेरा, अमरावती, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड व खंडवा या रेल्वेस्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे. तथापि, त्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. फलाटांवर जाणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

Web Title: Platform tickets will be available at Akola railway station for Rs 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.