रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 04:34 PM2020-03-08T16:34:45+5:302020-03-08T16:35:08+5:30

पर्यावरणपुरक रंगांची उधळून करून धुलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन आरोग्य विभाग, पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले.

Play colors ... But, be careful: Warning against chemical colours | रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एका दिवसावर धुलिवंदनाचा सण येऊन ठेपला असून, विविध रंग आणि पिचकाºयांनी बाजारपेठ सजली आहे. दुसरीकडे रासायनिक रंगांचे मानवी शरीरावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याने, पर्यावरणपुरक रंगांची उधळून करून धुलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन आरोग्य विभाग, पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले.
दरवर्षी जिल्ह्यात होळी व धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या उत्सवात रासायनिक रंगांमुळे त्वचा व शरिराला बाधा पोहोचू नये म्हणून विविध शाळांचे हरीत सेना पथकाने तसेच आरोग्य विभागाने पर्यावरणपुरक रंग उधळण्याबाबत जनजागृती केली तसेच हरीत सेना पथकाने नैसर्गिक रंग बनविण्याचा पद्धतीची माहितीदेखील दिली. धुळवडीच्या वेळेस वापरण्यात येणारे रासायनिक रंग मानवी व पर्यावरणीय आरोग्यासाठी घातक आहे. रासायनिक रंगामुळे आरोग्यावर विपरित होऊ शकतात, असे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले. नैसर्गिक रंग बनविण्याच्या पद्धतीही एसएमसीच्या स्कूलच्या प्राचार्या मीना उबगडे व शिक्षक अभिजित जोशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. रासायनिक रंग चेहºयावर विपरित परिणाम करतात. रंगाचा काही अंश डोळ्यात गेला तर अंधत्त्व येण्याचा धोकाही असतो. मानवी आरोग्यावरील संभाव्य परिणाम टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. अनिल कावरखे जोशी यांनी केले. दरम्यान, ८ मार्च रोजी रविवारी होळी व धुलिवंदनानिमित्त वाशिमची बाजारपेठ विविध प्रकारच्या दुकानांनी फुलून गेली होती. 
 
नैसर्गिक रंग बनविण्याच्या पध्दती 
जांभळा रंग - बिट या खाद्य फळाचा टाकावू सालापासून किंवा गरापासुन आकर्षक जांभळा रंग बनविता येतो. साल किंवा गर पाण्यात टाकून ढवळले असता जांभळा रंग तयार होतो. 
पिवळा रंग - बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळल्यास आकर्षक पिवळा रंग तयार होतो. एक भाग हळद दोन भाग कोणतेही पीठ यांचे मिश्रण पाण्यात टाकून ढवळले असता आकर्षक पिवळा रंग तयार होतो. 
काळा रंग - आवळा फळाचा किस लोखंडी तव्यावर टाकून त्यात पाणी टाकून उकळले असता गडद काळा रंग तयार होते.
नारिंगी रंग - बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळला असता नारिंगी रंग तयार होतो. 
लाल रंग - जास्वंद, पळस किंवा गुलाब फुलांचा कुटून लगदा करावा हा लगदा पाण्यात टाकून ढवळला असता आकर्षक लाल रंग तयार होतो. हिरवा रंग - गहू, ज्वारी, पालक किंवा कोणत्याही हिरव्या पानांचा कुटून लगदा करावा. हा लगदा पाण्यात टाकुन ढवळला असता आकर्षक असा हिरवा रंग प्राप्त होतो. 
 
 
रासायनिक रंगामुळे त्वचारोग जडू शकतात. त्यामुळे रासायनिक रंग टाळून धुलिवंदनाचा उत्सव साजरा करावा.
-डॉ. अनिल कावरखे
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

Web Title: Play colors ... But, be careful: Warning against chemical colours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.