अनुदानासाठी केले ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:13+5:302021-08-12T04:23:13+5:30
अकाेला : विनाअनुदानित सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदानाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र ...
अकाेला :
विनाअनुदानित सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदानाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने शिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर ढोल बजाओ आंदोलन केले.
शासनाच्या पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के वेतन अनुदान मिळणे आवश्यक असताना पुढील प्रचलित नियमाप्रमाणे कोणताही टप्पा वाढ दिलेला नाही. त्यामुळे १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित असतानाही केवळ २० टक्के व ४० टक्के अनुदान दिलेले आहे. काही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून अघोषित शाळा प्रलंबित ठेवलेल्या आहेत. अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शाळांनी त्रुटीची पूर्तता केल्यानंतरही त्यांना लाभ मिळत नाही. दरम्यान, शिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृती समितीचे विनोद इंगळे, संतोष वाघ, रवींद्र बाबाडे आदी शिक्षक उपस्थित होते.