केंद्र सरकाच्या विरोधा ‘प्रहार’चे थाळी बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:20+5:302021-05-22T04:17:20+5:30

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देशात तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा असताना दुसऱ्या देशातून तुरीची आयात कशासाठी, असा सवाल आंदोलनावेळी उपस्थित केला. ...

Play the 'Prahar' plate against the central government | केंद्र सरकाच्या विरोधा ‘प्रहार’चे थाळी बजाओ आंदोलन

केंद्र सरकाच्या विरोधा ‘प्रहार’चे थाळी बजाओ आंदोलन

Next

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देशात तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा असताना दुसऱ्या देशातून तुरीची आयात कशासाठी, असा सवाल आंदोलनावेळी उपस्थित केला. आता केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना आणखी फटका बसला आहे. केंद्र सरकारचे आयात धोरण हे शेतकरी विरोधी असून, या सरकारने आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांच्या विरोधातच निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केलेल्या आवाहनाला प्रहार कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत राज्यभर केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी प्रहार संघटनेचे विधानसभा प्रमुख राजकुमार नाचणे, तालुका प्रमुख संतोष इंगोले, तालुका उपाध्यक्ष अमोल वानखडे, शहर प्रमुख सागर पुंडकर, संदीप कोहाळे, पुरुषोत्तम ठोकळ, राम कांबे, विशाल हुतके आदी प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Play the 'Prahar' plate against the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.