हात जोडतो, वाहतुकीचे नियम पाळा; विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:20 PM2021-02-04T19:20:49+5:302021-02-04T19:21:43+5:30

Akola News शहरातील विविध चौकात पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जानजागृती केली.

Please Obeys traffic rules; Awareness created by the students through street plays | हात जोडतो, वाहतुकीचे नियम पाळा; विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे केली जनजागृती

हात जोडतो, वाहतुकीचे नियम पाळा; विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे केली जनजागृती

Next

अकोला : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी शहरातील विविध चौकात पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जानजागृती केली. यावेळी त्यांनी हात जाेडतो, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन नागरिकांना केले. शहर वाहतूक विभागातर्फे आयोजित मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौक, खुले नाट्य गृह चौकात पथनाट्य सादर केले. पथनाट्यामध्ये वेगाने वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न केल्याने काय दुष्परिणाम होतात या बाबत संदेश दिला. पथनाट्य सादरीकरणासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी पुढाकार घेतला. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, रासेयो अकोला जिल्हा समन्वयक डॉ. संजय तिडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश खेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन बुंदेले दिग्दर्शित रस्ता सुरक्षा पथनाट्यामध्ये हर्षल पाटील, अखिलेश अनासने, योगेश राऊत, शुभम जमोदे, माधुरी इंगळे, प्रगती ढोबळे, ईशा मेसरे, अभिजित वानखेडे, वैभव चोपडे, अंजली खंडेराव, आम्रपाली दंदी, सचिन काळे, राजश्री इंगळे, वैष्णवी आसेकर यांनी सहभाग नोंदवला.

Web Title: Please Obeys traffic rules; Awareness created by the students through street plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.