पातोंडा ते जऊळखेड रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:03+5:302021-09-19T04:20:03+5:30
रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तसेच गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची ...
रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तसेच गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील डांबर उखडले असून, अनेक ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत. त्यावरून वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत केल्यासारखे आहे. विशेषतः रुग्णांना वेळेवर उपचार करण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी तसेच गावातील नागरिकांनी केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले. मात्र, अद्यापही कामाला वेग न आल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लावावीत.
- चंद्रशेखर नारोकर, वाहनचालक
मार्डी-खिरकुंड रस्त्यावरचा पूल खचला!
अकोट : अकोट मार्डी, खिरकुंड, डांगरखेड, वस्तापूर या आदिवासीबहुल भागाला जोडणारा एकमेव पुलाखालील मलबा खचला आहे. पुरामुळे मोठा खड्डा पडल्याने पाच गावांतील संपर्क तुटला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर गौण खनिज उत्खनन करून वाहन जात असून, हाकेच्या अंतरावर खिरकुंड धरण असल्याने तसेच आदिवासी गाव असल्याने प्रशासनाने त्वरित हा पूल दुरुस्त करून देण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरत आहे.