लघू उद्योजकांसाठी आता भूखंड वितरणाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:25 PM2019-02-15T14:25:52+5:302019-02-15T14:25:56+5:30

अकोला : लहान उद्योजकांना चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून लघू उद्योजकांना आता लहान भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे; मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे लोकाभिमुख असलेली ही योजना सर्वसामान्यांपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही.

Plot distribution plan for small businessmen now | लघू उद्योजकांसाठी आता भूखंड वितरणाची योजना

लघू उद्योजकांसाठी आता भूखंड वितरणाची योजना

Next

अकोला : लहान उद्योजकांना चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून लघू उद्योजकांना आता लहान भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे; मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे लोकाभिमुख असलेली ही योजना सर्वसामान्यांपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही.
लहान-लहान उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी मुद्रा लोन देण्याचा अभिनव प्रयोग या शासनाने केला. त्यानंतर आता लहान उद्योजकांना हक्काची जागा देण्यासाठी नवी योजना जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून राबविली जात आहे. यासाठी लघू व्यावसायिकांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक लघू उद्योजकांपर्यंत या योजनेची माहिती न पोहोचल्याने लघू व्यावसायिक या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महिला उद्योजकांना यासाठी प्राध्यान दिले जात आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, लघू व्यावसायिकांनी भूखंडाच्या लाभासाठी खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
 
खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्रांतर्फे ही योजना आखली गेली आहे. प्रस्तावदेखील त्याच्या माध्यमातूनच येणार आहे. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही प्लॉट वितरण करून देणार आहोत. पाचशे मीटरचे लहान भूखंड या योजनेत वितरित केले जाणार आहेत.
- सुधाकर फुके,
विभागीय अधिकारी, म. औ. व. वि. महामंडळ, अमरावती.

Web Title: Plot distribution plan for small businessmen now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.