भूखंड घोटाळय़ात पोलिसांचा ‘से’ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:21 AM2017-11-01T01:21:37+5:302017-11-01T01:25:55+5:30
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात दीपक कृषी सेवा केंद्राचा संचालक दीपक रमेश झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड या दोघांना आ िर्थक गुन्हे शाखेने आरोपी केल्यानंतर त्यांच्या नियमित अटकपूर्व जामिनापूर्वी पोलिसांनी ‘से’ दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलि िखत दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केल्यानंतर त्यांच्या तपासात गजराज गुदडमल मारवाडी (झांबड) यांचा नातू दीपक रमेश झांबड व मुलगा रमेश गजराज झांबड या दोघांनी कट रचल्याचे समोर आले. यावरून या दोघांनाही सदर प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे; मात्र दोघांनीही गुन्हे दाखल होण्यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली होती.त्यामुळे न्यायालयाने या दोन्ही आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे; मात्र नियमित जामीन अर्जावरील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘से’ दाखल करण्यात आला आहे.