अकोल्यातील भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:38 PM2017-12-23T13:38:45+5:302017-12-23T13:43:31+5:30

 अकोला - शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड घोटाळयात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयातील मुख्य आरोपी दिपक रमेश झांबड आणि रमेश गजराज झांबड या दोघांना शनिवारी सकाळी अकोल्यात बेडया ठोकल्या.

Plot scam in Akola; Zambad father and son were finally arrested | अकोल्यातील भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

अकोल्यातील भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

Next
ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी शनिवारी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली.शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात हेरफेर करून बळकावला होता.‘लोकमत’ने वृत्तमालिका चालवून आणले होते प्रकरण उघडकीस.

सचिन राऊत

 अकोला - शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड घोटाळयात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयातील मुख्य आरोपी दिपक रमेश झांबड आणि रमेश गजराज झांबड या दोघांना शनिवारी सकाळी अकोल्यात बेडया ठोकल्या. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २० कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात आॅनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपून घोटाळा करण्यात आला होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केल्यानंतर याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अमर डिकाव यांनी तक्रार केली; मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला; मात्र पिता-पुत्राने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ केली. जिल्हा व सत्र न्यायालयाने झांबड पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघेही फरार झाले होते, मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी शनिवारी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

आता अधिकारी-कर्मचाºयांवर गडांतर
भुमी अभिलेख विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांचे नावे आता उघड होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर २० कोटी रुपयांच्या या घोटाळयात सहभागी असलेल्या भुमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांनाही बेडया ठोकण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Plot scam in Akola; Zambad father and son were finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.