मूग पिकावर फिरविला नांगर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:39 AM2020-08-01T10:39:59+5:302020-08-01T10:40:20+5:30
मूग पिकाचा फुलोरा खाली पडत असून, पीक सुकत चालल्याने पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हातरुण : सध्या मुगाचे पीक शेतात बहरले असून, पिकाला फुलधारणा झाली आहे; मात्र यंदा मुगाच्या पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाले असून, शेतकरी संकाटात सापडला आहे. मंडाळा येथील शेतकऱ्याने १० एकर शेतात मुगाच्या पिकाची पेरणी केली. मुगाला फुलधारणा झाली आहे; मात्र मूग पिकाचा फुलोरा खाली पडत असून, पीक सुकत चालल्याने पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
मंडाळा येथील शेतकरी मुरलीधर टाले यांनी १० एकर शेतात मुगाची पेरणी केली. पेरणीनंतर परिश्रमाच्या जोरावर पीक फुलविले. अचानक हिरवेगार असलेल्या मूग पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातले. त्यामुळे मुगाचे पीक सुकत चालले आहे. जवळपास ४० ते ५० दिवसांपासून पिकाला जपत असलेल्या शेतकºयाने अखेर मुगाच्य पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
खारपाणपट्ट्यात येत असलेल्या हातरुण, शिंगोली, मंडाळा, दुधाळा, खंडाळा, निमकर्दा, लोणाग्रा, हातला, मालवाडा या परिसरात मुगाचा पेरा यंदा बºयापैकी आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते त्यानंतर पेरणीसाठी खर्च आला.
मुगावर रोग आल्याने महागड्या औषधांची फवारणीसुद्धा केली. तरीही पीक सुकत चालल्याने शेतकºयाने पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणणे आहे.
दहा एकर फुलोºयावर आलेल्या मूग पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक सुकत चालले आहे. लागवडीचा खर्चही वसूल होणार नसल्याने मुगाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
- मुरलीधर टाले, शेतकरी