पोदार, माउंट कारमेल संघाचा उपान्त्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:52 AM2017-08-05T01:52:58+5:302017-08-05T01:53:23+5:30

अकोला : लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे शुक्रवारी जिल्हास्तरीय मनपाक्षेत्र शालेय (१४ वर्षांआतील मुले) फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात उपान्त्यपूर्व फेरीला सुरुवात करण्यात आली. उपान्त्यपूर्व फेरीतील पहिला सामना होलीक्रॉस कॉन्व्हेंट व पोदार इंटरनॅशनल स्कूल संघात झाला. पोदार स्कूलने सामना 0-१ ने जिंकून उपान्त्य सामन्यात प्रवेश मिळविला. दुसरा सामना माउंट कारमेल व सेंट अँन्स स्कूलमध्ये झाला. कारमेल संघाने उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत सामना ३-0 ने विजय मिळवित उपान्त्यफेरीत स्थान निश्‍चित केले.

Poddar, the semi-finals of the Mount Carmel team | पोदार, माउंट कारमेल संघाचा उपान्त्य फेरीत प्रवेश

पोदार, माउंट कारमेल संघाचा उपान्त्य फेरीत प्रवेश

Next
ठळक मुद्देरहेबर स्कूल, उस्मान आझाद, प्रभात किड्स, स्कूल ऑफ स्कॉलर्स उपान्त्यपूर्व फेरीतजिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा

अकोला : लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे शुक्रवारी जिल्हास्तरीय मनपाक्षेत्र शालेय (१४ वर्षांआतील मुले) फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात उपान्त्यपूर्व फेरीला सुरुवात करण्यात आली. उपान्त्यपूर्व फेरीतील पहिला सामना होलीक्रॉस कॉन्व्हेंट व पोदार इंटरनॅशनल स्कूल संघात झाला. पोदार स्कूलने सामना 0-१ ने जिंकून उपान्त्य सामन्यात प्रवेश मिळविला. दुसरा सामना माउंट कारमेल व सेंट अँन्स स्कूलमध्ये झाला. कारमेल संघाने उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत सामना ३-0 ने विजय मिळवित उपान्त्यफेरीत स्थान निश्‍चित केले.
शनिवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात उपान्त्यपूर्व फेरीतील तिसरा सामना रहेबर उर्दू स्कूल व प्रभात किड्स संघात होणार आहे, तर चौथा सामना उस्मान आझाद उर्दू हायस्कूल व स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड शाखा संघात होणार आहे. या दोन सामन्यांतील विजेते संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील. दुपारच्या सत्रात उपान्त्य फेरीतील सामने आणि त्यानंतर स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यात येणार आहे.
उप-उपान्त्य फेरीतील सामन्यांमध्ये रहेबर उर्दू हायस्कूलने नोएल स्कूल (स्टेट)चा ३-0 ने पराभव केला. अली पब्लिक स्कूलला प्रभात किड्सने 0-४ ने पराभूत केले. अंग्लो उर्दू स्कूल व उस्मान आझाद स्कूलमधील सामन्यात, अंग्लो स्कूल संघ वेळेवर मैदानात न पोहोचल्यामुळे उस्मान आझाद संघाला पुढे चाल देण्यात आली, तसेच यानंतरच्या सामन्यात ताज इंग्लिश स्कूल सामन्याची घोषणा झाल्यानंतरही मैदानात हजर न झाल्याने पंचांनी एसओएस (हिंगणा) संघाला विजयी घोषित केले. पोदार स्कूल व नोएल स्कूल (सीबीएसई) संघात खेळण्यात आलेल्या सामन्यात पोदार स्कूल संघ १-0 ने विजयी झाला. होलीक्रॉस स्कूल व सुफ्फा इंग्लिश स्कूल संघातील सामन्यात होलीक्रॉसने १-0 ने विजय मिळविला, तर सेंट अँन्स व जीएस कॉन्व्हेंटमध्ये झालेल्या सामन्यात सेंट अँन्स संघाने २-१ ने सामना जिंकला. माउंट कारमेल व एसओएस (बिर्ला) संघातील सामना माउंट कारमेलने २-0 ने जिंक ला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र पोलीस संघाचे माजी कर्णधार देवीदास सज्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, शारीरिक शिक्षण शिक्षक राजेश्‍वर पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून पोलीस विभागाचे नईम खान, मेहबुब खान, धीरज चव्हाण, अन्जार अहमद कुरेशी, इरशाद खान, एनआयएस सईद खान, अझहर शेख यांनी काम पाहिले. 
 
Web Title: Poddar, the semi-finals of the Mount Carmel team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.