कविता ही व्यापक असावी -विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:51+5:302021-04-09T04:18:51+5:30

ऑनलाइन प्रकाशन सोहळ्याला लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, प्राचार्य डॉ. रमेश अंधारे, प्रा. यादव वक्‍ते यांची प्रमुख उपस्थिती होते. प्रास्ताविकात ...

Poetry should be comprehensive - Vitthal Wagh | कविता ही व्यापक असावी -विठ्ठल वाघ

कविता ही व्यापक असावी -विठ्ठल वाघ

Next

ऑनलाइन प्रकाशन सोहळ्याला लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, प्राचार्य डॉ. रमेश अंधारे, प्रा. यादव वक्‍ते यांची प्रमुख उपस्थिती होते. प्रास्ताविकात नारायण अंधारे हे आद्याक्षरी काव्यरचनेत सिद्धहस्त असल्याचे प्रा. वक्ते यांनी सांगितले. तुळशीराम बोबडे यांनी मनोगत व्यक्त करताना काव्यरचनांचा आढावा घेतला. संस्कृत भारतीचे भगवंतराव गावंडे आसलगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन विशेष कार्याधिकारी प्रकाश अंधारे यांनी केले. साने गुरुजी प्रार्थना रामदास वांडे गुरुजी यांनी गायिली. यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक संघ चळवळीतील पदाधिकारी ना.ना. इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुहास काटे, विनायकराव पांडे, प्रादेशिक अध्यक्ष प्रकाश पिंपरकर, माजी प्रादेशिक अध्यक्ष चोथमल सारडा, प्राचार्य अरुण राऊत, प्रा. विलास राऊत उपस्थित होते. आभार कृष्णा अंधारे यांनी मानले.

Web Title: Poetry should be comprehensive - Vitthal Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.