वाढदिवस समारंभातील जेवणातून १५० लोकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 02:25 PM2022-03-01T14:25:38+5:302022-03-01T14:25:55+5:30
FoodPoisoning 150 people at a birthday party : मुलाच्या वाढदिवसाचा निमित्ताने आप्त नातेवाईकांसाठी २८ फेब्रुवारी रोजी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता
मूर्तिजापूर : तालुक्यातील घुंगशी येथील गोपाल सौंदळे यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा निमित्ताने आप्त नातेवाईकांसाठी २८ फेब्रुवारी रोजी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याच जेवणातून १५० विषबाधा झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.
सोमवारी रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रमात जेवण घेतल्या नंतर झोपी जेवण गेलेल्या लोकांना मध्यरात्रीनंतर उलट्या, जुलाब व मळमळ व्हायला लागली दरम्यान पहाटे जेवण केलेल्या सर्वच लोकांना या गोष्टीचा त्रास व्हायला लागला, या कार्यक्रमात २०० ते २५० लोकांनी जेवण केल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
२५० पैकी यात १५० लोकांना अन्नातून विशबाधा झाली तर काही विषबाधेचे लक्षणे जाणवले नाही. विषबाधा सौम्य असली तरी ६० नागरीकांवर घुंगशी येथील आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले. तर ३० बाधितांना पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल कले. त्यांच्यावर उपचार त्यांना सुट्टी देण्यात आली, असली तरी ते आरोग्य यंत्रणेच्या निगराणीत असून सद्यस्थितीत ६ लोकांवर पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जावेद खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे, पारद प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल सिरसाट व प्राथमिक आरोग्य केंद्राततील चमू ठान मांडून आहेत.